Nitesh Rane Bail News Updates sakal
कोकण

Nitesh Rane Bail: मोठी बातमी! नितेश राणेंना जामीन मंजूर

ओमकार वाबळे

भाजप आमदार नितेश राणेंना जामीन मंजूर झाला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने संतोष परब हल्ला प्रकरणी त्यांना दिलासा दिला आहे. 30 हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झाला आहे.(Bail Granted to Nitesh Rane)

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश एस.व्ही.हांडे यांनी नितेश राणेंना जामीन मंजूर केला आहे. ४ फेब्रुवारीला राणेंनी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावरील सुनावणी ८ रोजी पूर्ण झाली होती. अखेर न्यायालयाने निर्णय दिला आहे.

भाजपचे आमदार नितेश राणे यांना संतोष परब हल्ल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी दिली. मात्र, प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर राणेंना पुन्हा कोर्टात हजर करण्यात येणार होतं. मात्र त्यांची प्रकृती खालवल्याने कोल्हापुरला हालण्यात आलं होतं. अखेर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. दरम्यान, मंत्री नारायण राणे दिल्लीतील संसदीय अधिवेशनातून थेट सिंधुदूर्गमध्ये दाखल झाले होते. (Nitesh Rane News Update)

काही दिवसांपूर्वी नितेश राणे कणकवली न्यायालयात शरण आले होते. यानंतर त्यांनी न्यायालयीन कोठडीसाठी मागणी केली. मात्र, संतोष परब हल्ल्यात चौकशी सुरू असल्याने पोलिसांनी न्यायालयाकडे वेळ मागितला. यानंतर न्यायालयाने राणेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर पुन्हा न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. प्रकृती बिघडल्याने राणेंना कोल्हापूरला दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कोर्टातील सुनावणी दरम्यान ते स्वत: हजर राहू शकले नाहीत

काय आहे प्रकरण?

१८ डिसेंबर २०२१ रोजी कणकवली शहरातील नरडवे तिठा येथे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख असलेल्या संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यातील संशयित आरोपी अटक केल्यानंतर तपासाची सुई आमदार नितेश राणे यांच्याकडे गेली होती. त्यामुळं कणकवली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी आपल्याला अटक होऊ नये यासाठी नितेश राणे आणि संदेश सावंत यांच्यावतीनं जिल्हा न्यायालयात २७ डिसेंबर रोजी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. या अर्जावर २८ व २९ रोजी सुनावणी झाल त्यानंतर कोर्टानं निकाल राखून ठेवण्यात आला होता. गुरु

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: 'हिजाब घालणे' इस्लामिक श्रद्धेचा अनिवार्य भाग नाही; हायकोर्टाचा मोठा निकाल, याचिका फेटाळली

Gokul Election 2026 : 'गोकुळ' बिनविरोध होणार नाहीच! आमदार सतेज पाटील यांचा महायुतीला थेट इशारा, ताकदीने लढण्याची घोषणा

स्वत:च्या मृत्यूची बातमी वाचताच सिद्धार्थ जाधव भडकला, म्हणाला...'कसली घाई आहे यांना...'

Marathi News Live Updates : राहुल गांधींनी आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रश्न उपस्थित करणे चुकीचे कसे?; संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर निशाणा

Raju Shetti: ‘श्रीराम साखर कारखाना बंद पाडण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रयत्न’; राजू शेट्टींचा गंभीर आरोप, आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT