nilesh rane Esakal
कोकण

Banda Political News: राणेंनी समजूत घालताच बांदेकरांनी घेतला अर्ज मागे

बांदा ग्रामपंचायत पोटनिवडणुक ः शेवटच्या दिवशी पाच जणांचे अर्ज मागे

सकाळ वृत्तसेवा

बांदा : बांदा (Banda) शहर ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक चारमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजपने राजाराम उर्फ बाळू सावळाराम सावंत (Balu Savlaram) यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केल्याने आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ५ जणांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे या प्रभागात शिवसेनेचे समीर श्रीकांत पेळपकर (Sameer Pelpakar) व भाजपचे सावंत यांच्यात थेट लढत होणार आहे.

आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ऋषिकेश सीताराम देसाई, गोविंद केशव सावंत, लक्ष्मी राजाराम सावंत व निलेश मधुकर सावंत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले; मात्र भाजपचे बांदा युवा मोर्चा मंडल उपाध्यक्ष संदीप बांदेकर यांनी उमेदवारी न दिल्यास अर्ज माघार न घेण्याचा इशारा दिला.

सावंतवाडी येथे भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी बांदेकर यांची समजूत घातल्याने त्यांनी उशिरा अर्ज मागे घेतला. यावेळी पुढील ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी देण्याचा शब्द राणे यांनी दिल्याने उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे बांदेकर यांनी सांगितले.

प्रभाग क्रमांक चारच्या पोटनिवडणुकीत एकूण ७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. बांदेकर यांनी माजी खासदार राणे यांची सावंतवाडी येथे भेट घेतली. त्यावेळी राणे यांनी पुढील निवडणुकीत उमेदवारी देण्याचा शब्द दिला. त्यामुळे आपण यापुढेही केंद्रीय मंत्री नारायण राणे, युवा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून भाजप पक्षाचे काम करणार असल्याचे बांदेकर यांनी सांगितले.

प्रभाग चारमध्ये पक्षाने दिलेला उमेदवार राजाराम सावंत यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार यावेळी बांदेकर यांनी केला. यावेळी त्यांच्यासोबत सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, बांदा मंडल प्रभारी प्रमोद कामत, नगरसेवक सुधीर आरीवडेकर, भाजपा युवा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतिब, ज्ञानेश्वर सावंत, गुरुनाथ सावंत, प्रवीण पंडित दीपक सावंत, साई धारगळकर आदी उपस्थित होते. त्यामुळे आता सेनेचे पेळपकर व भाजपचे सावंत यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. २१ ला मतदान होणार असून २२ ला निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT