Bappa made during the lockdown in ratnagiri kokan marathi news 
कोकण

लॉकडाऊनच्या काळात रत्नागिरीत बनताहेत बाप्पा....

मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : टाळेबंदीच्या काळात घरात बसून काय करायचे हा प्रश्‍न अनेकांना पडला आहे. परंतु मूर्तीकार श्रीधर गोखले हे रत्नागिरीतून मुळ गावी गिर्ये (ता. देवगड) येथे गेले आहेत. तेथे त्यांनी चक्क लाडक्या गणपती बाप्पाच्या मूर्ती साकारण्यास प्रारंभ केला. एक ते दोन फुटांच्या सात मूर्ती साकारल्या असून दीड दिवसांत एक मूर्ती पूर्ण होते. यातून खूपच आनंद मिळत असल्याचे त्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

श्री. गोखले हे लहानपणापासून गणेशमूर्ती बनवतात. नोकरीनिमित्त रत्नागिरीत आल्यावरही त्यांनी येथे मूर्ती साकारल्या. एसटीमध्ये चालक असताना गंभीर अपघातात त्यांना अपंगत्व आले. परंतु त्यावर मात करत त्यांनी मूर्तीकलेचा छंद सोडला नाही. किंबहुना दरवर्षी ते पन्नास ते शंभर मूर्ती साकारू लागले. अलीकडे ते काही घरगुती गणपती साकारतात. तसेच रत्नागिरीत ते व पत्नी सौ. अर्चना गोखले या स्वामी समर्थ उपाहारगृहसुद्धा चालवतात.

टाळेबंदीचा असाही उपयोग
टाळेबंदीपूर्वीच श्री. गोखले सहकुटुंब गिर्ये येथे रवाना झाले. तेथे गेल्यावर्षीची शाडू मातीची पोती शिल्लक होती. 21 दिवसांच्या टाळेबंदीत मूर्ती बनवून आपला वेळ व्यतीत करायचा, यातून आनंद मिळवायचा, असे गोखले काकांनी ठरवले. दरवर्षी पावसाळ्यात कामाला सुरवात होते. यंदा 22 ऑगस्ट रोजी गणेशचतुर्थी आहे. पावसाळ्यात भरपूर पाऊस, आर्द्रता भरपूर असते. त्यामुळे मूर्ती बनवताना अडचणी येतात. रंग सुकण्यासाठी वेळ लागतो. वेळेवर साहित्य मिळत नाही. मात्र आता मुर्तीकाम अधिक वेगाने आणि शांतचित्ताने होत असल्याचे गोखले यांनी सांगितले. यातून खूपच आनंद मिळतो, असेही त्यांनी सांगितले.

आंबा, केळी व्यवसायही संकटात

कोरोनाच्या (कोविड-19) वाढत्या संसर्गामुळे टाळेबंदीची मुदतही वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. गिर्ये येथे श्री. गोखले यांनी आंबा व केळीची बागायत केली आहे. सध्या आंबा काढणी जोरात सुरू आहे. त्यातही गोखले आपला सकाळचा वेळ घालवतात. परंतु टाळेबंदीमुळे आंबा, केळी विक्री अडचणीत सापडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-New Zealand FTA: 20 ऑक्टोबरपासून दारू होणार स्वस्त! भारत-न्यूझीलंड FTA मुळे तुम्हाला काय फायदा?

Tempo Bike Accident : भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने दोन मोटारसायकलला पाठीमागुन उडविल्याने एक जणाचा मृत्यू; तर एकजण जखमी

Marathi News Live Updates: पाण्याची टाकी पाडताना जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

Pitru Paksha 2026: यंदा पितृ पंधरवडा कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या महत्त्वाच्या तिथी

Marathwada Drought : पावसाने पाठ फिरवली; शेतकरी हवालदिल;सोयाबीनला पाणी देण्याची धडपडही निष्फळ; आर्थिक संकट गडद

SCROLL FOR NEXT