basara star ship final decision wrecked in mirya port after four months in ratnagiri 
कोकण

मिऱ्यात चार महिने अडकलेले बसरा स्टार जहाज शेवटी भंगारातच

राजेश शेळके

रत्नागिरी : मिऱ्या किनाऱ्यावर अडकलेल्या बसरा स्टार या इंधनवाहू जहाजाचा दक्षिण आफ्रिका ते शारजा-दुबई हा समुद्री प्रवास अखेरचा ठरला आहे. आज या जहाजाला किनाऱ्यावर अडकून चार महिने पूर्ण झाले. इंटरनॅशनल मेरिटाईम ऑर्गनायझेशनच्या सर्वेअरनी केलेल्या सर्व्हेनंतर हे जहाज भंगारात काढण्याचा एजन्सीचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. अतिशय सुरक्षितपणे जहाजाची मोडतोड करून किनारा रिकामा केला जाणार आहे. 

बसरा स्टार जहाज इंधन घेऊन दक्षिण आफ्रिकेहून शारजा-दुबईला जात होते. सुमारे २५ हजार लिटर डिझेल या जहाजात होते; मात्र ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा इशारा मिळाला आणि हे जहाज आश्रयासाठी बंदर विभागाची परवानगी घेऊन नर्मदा जेटीला लावण्यात आले होते. जहाजावर तेरा क्रू होते. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न होता. ३ जूनला वादळाचा कोकण किनाऱ्याला जोरदार फटका बसला. या तडाख्यामध्ये जहाजाचा अँकर तुटला आणि जहाज समुद्रात भरकटले.

अजस्र लाटांचा मारा खात ते मिऱ्या किनाऱ्याला लागले. तेव्हा तेरा क्रू जहाजावर होते. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला; मात्र बंदर विभाग, स्थानिक, पोलिस आदींनी रेस्क्‍यू ऑपरेशन करून त्यांची सुटका केली. त्यानंतर जहाजावरील ऑइल आणि डिझेलच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. गळती लागल्यास एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑइल किंवा डिझेल पाण्यात मिसळून किनारा दूषित होण्याची भीती होती.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway : नवरात्रोत्सवापासून ते दिवाळीपर्यंत... 'या' राज्यात धावणार विशेष गाड्या; 6,000 गाड्यांचं नियोजन, पाहा रेल्वेचं वेळापत्रक

Women Health: पाळी, गरोदरपणा आणि रजोनिवृत्तीचा स्त्रियांच्या आतड्यांवर परिणाम; वाचा डॉ. राकेश पटेल यांचे सविस्तर मार्गदर्शन

Gemini AI Photo Trend: जगातील नेत्यांसोबत हायपर-रिअ‍ॅलिस्टिक फोटो तयार करा! जाणून घ्या सोप्या स्टेप्स...

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजना बंद होणार नाही: मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही

SIP Top 5 Mistakes: SIP मध्ये गुंतवणूक करताय? या 5 चुका टाळा, नाहीतर रिटर्न्स मिळण्याऐवजी नुकसान होऊ शकतं

SCROLL FOR NEXT