Bear attack on women in sawantwadi  
कोकण

धक्कादायक ; गुरे राखण्यासाठी गेलेल्या महिलेवर अस्वलाचा प्राणघातक हल्ला

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी - जणावरे चारण्यासाठी गेलेल्या महिलेवर अस्वलाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना चाैकुळ येथे घडली आहे. या हल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी सावंतवाडी येथे हलविण्यात आले आहे. सोनी मया पाटील (वय ४५) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, भेकुर्ली येथील सोनी पाटील या जळवाडी येथे गुरे राखण्यासाठी राहत होत्या. त्या जळ वाडी येथे खातशेत वाडी बुडबुडे जंगल येथे आज गुरांबरोबर गेली होत्या. त्यांच्यासोबत एक पुरुष सहकारीही होता. जणावरे चारत असताना आज सकाळी १० च्या दरम्यान एका अस्वलाने सोनी यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या पाय आणि मांडीला चावा घेतला. आरडाओरडा केल्याने बरोबरच्या असलेल्या पुरुषाने अस्वलाला हाकलले. यानंतर जखमी महिलेला चिखलव्हल बेरडकी येथून आंबोली आरोग्य केंद्रातून १०८ रुग्णवाहिकेतून चौकुल येथे नेण्यात आले. या ठिकाणी डॉ. महेश जाधव आणि परिचारिका अस्मिता कोठावळे यांनी उपचार केले. यानंतर त्यांना सावंतवाडी कुटीर रुग्णालयात हलवण्यात आले आहे. चौकूळ येथील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग गावडे यांनी नातेवाईकांना माहिती दिली. आंबोली वनखात्याचे वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव व वनपाल पृथ्वीराज प्रताप यांनी आरोग्य केंद्रात जाऊन महिलेची विचारपूस केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Fee: 'यूपीआय'वरील शुल्कावरुन होणाऱ्या आरोपांना सरकारचं स्पष्टीकरण; 95 टक्के व्यवहार मोफतच...

Prataprao Pawar : कृषी, शिक्षणातील समस्या सोडविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा

Harry Brook Record: इंग्लंडच्या कर्णधार हॅरी ब्रूकने रचला इतिहास, T20 वर्ल्ड कप विजेत्या कर्णधार रोहित शर्मालाही हे जमलं नाही

BCCI ची मोठी घोषणा! WPL 2027 च्या तारखा जाहीर; २८ ऑक्टोबरला ऑक्शन, फ्रँचायझीला या महिन्याची दिलीय डेडलाईन, नेमकं काय?

Road Development : धनंजय मुंडेंच्या मागणीला यश! लोखंडी सावरगाव-बर्दापूर फाटा रस्ता होणार चौपदरी; १०४.४९ कोटींच्या कामाची निविदा प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT