Best Pattern of Magic Pit in SIndhudurg Exprement in Vanivade 
कोकण

"मॅजिक पिट'चा सिंधुदुर्गात सर्वोत्तम पॅटर्न, वानीवडेत राबवला प्रयोग 

विनोद दळवी

ओरोस ( सिंधुदुर्ग) - सांडपाणी व्यवस्थापनसाठी "मॅजिक पिट प्लस' नावाने सर्वोत्तम पॅटर्न सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकसित झाला आहे. मुळ नांदेड पॅटर्न असलेल्या मॅजिक पिटला सर्वोत्तम बनविण्याची संकल्पना वानीवडे (ता. देवगड) ग्रामसेवक हनुमंत तेरसे यांनी राबवत ती यशस्वी केली आहे.

आतापर्यंत उघड्या शौषखड्यात सांडपाणी सोडण्यात येत होते. तोच खड्डा रोजगार हमी योजना व 14 वा वित्त आयोगमधून निधी उपलब्ध करीत बंदिस्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे तांत्रिकदृष्ट्या तयार केलेल्या मॅजिक पिट प्लसमुळे पावसात सुद्धा पाणी ओव्हर फ्लो होत नाही. सांडपाणी कुजल्याने येणारी दुर्गंधी सुद्धा येत नाही. नानीवडे व बापार्डे या दोन गावांत ही योजना यशस्वी राबविली जात आहे. 

हागणदारी मुक्त अभियान यशस्वीतेनंतर शासनाने सांडपाणी व्यवस्थापन व घनकचरा निर्मूलनसाठी पावले उचलली आहेत. याच उपक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाने सांडपाणी व घनकचरा यासाठी कोणते उपाय राबविता येतील? याचा सर्व्हे सुरु केला आहे. त्यातील सांडपाणी व्यवस्थापनसाठी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यातूनच मॅजिक पिट प्लस या सिंधुदुर्ग पॅटर्नची निर्मिती झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसंख्येची घनता जास्त असलेली हाताच्या बोटावर मोजण्या इतकी गावे सोडल्यास अन्य गावात विरळ वस्ती आहे. या ठिकाणी बंदिस्त गटारसारखी उपाययोजना राबविणे शक्‍य नसल्याने शौषखड्डा ही संकल्पना राबविण्यात येते; परंतु हे शौषखड्डे उघडे असायचे. त्यात सांडपाणी जात असलेतरी भरपुर पाणी जावून ते अन्यत्र वाहून जाणे तसेच पाणी साचुन दुर्गंधी येणे, हा प्रकार होत असल्याने मॅंजिक पिट प्लस ही उपाययोजना यशस्वी होत नव्हती. 

ग्रामसेवक हनुमंत तेरसे यानी मॅजिक पिट प्लस नावाने विकसित केलेली संकल्पना या सर्वांवर मात करणारी ठरत असल्याचे जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाकडून सांगण्यात येत आहे. ही संकल्पना खर्चिक असलीतरी त्याला महात्मा गांधी रोजगार हमी योजना व 14 वा वित्त आयोग निधी यातून आर्थिक उपलब्धी करून देण्यात आल्याने ग्रामीण भागातील घराघरांत ही संकल्पना राबविणे शासकीय यंत्रणेला शक्‍य होत आहे.

घरातून येणारे सांडपाणी उघड्यावर न सोडता त्याला तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने प्रतिबंधित करता येत असल्याने ही संकल्पना अधिक लोकप्रिय होत आहे. जिल्ह्यातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत असल्याचे जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाकडून सांगण्यात आले. 

अशाप्रकारे बनतो मॅजिक पिट प्लस 
यासाठी 75 मिलीमीटर व्यासाचा पिव्हिसी पाईप, 1 मीटर उंचीची आणि 0.9 मीटर व्यासाची सीमेंट टाकी, वेगवेगळ्या आकाराचे दगडगोटे इत्यादी साहित्य लागते. 1.2 मीटर बाय 1.2 मीटर बाय 1.2 मीटर खड्डा खोदावा लागतो. खड्डा खोदल्यावर 0.15 मीटर बोल्डर थर. त्यानंतर खड्यात टाकी बसवायची. त्यानंतर खड्यात 25 मीटर उंचीचा थर रचला जातो. त्यात पहिले 100 ते 150 मिलीमीटर दगड, 75 ते 100 मिलीमीटर दगड, 50 ते 75 मिलीमीटर व 20 ते 30 मिलीमीटर जाडीच्या दगडांचा समावेश करण्यात यावा. यासाठी रोजगार हमी योजनेतून 2500 रुपये तर 14 वा वित्त आयोगातून 1300 रुपये असे मिळून 3 हजार 800 रुपये खर्च येत आहे. 

""या उपक्रमासाठी गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांचे मार्गदर्शन लाभले. सरपंच प्राची घाडी यांच्यासह उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्यामुळे वानीवडे गावात हा उपक्रम राबविता आला. आतापर्यंत सुमारे 50 बंदिस्त खड्डे गावात उभारले आहेत. गावातील ग्रामस्थाचा सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. हाच उपक्रम बापार्डे ग्रामपंचायतमध्ये सुद्धा राबविला आहे.'' 
- हनुमंत तेरसे, ग्रामसेवक, वानीवडे 

""शोषखड्डा हा सांडपाण्याची विल्हेवाट करण्यासाठी केलेला खड्डा होय. परसबाग व शोषखड्डा हे प्रत्येक कुटुंबात करता येते. घराभोवती, रस्त्यात आणि गटारीत तुंबलेले सांडपाणी आरोग्यास घातक असते. तसेच त्याचा घाण वास येतो, रस्त्यावर त्या पाण्याने चिकचिक होऊन घसरडे होते आणि डासांना अंडी घालायला जागा मिळते. हे डास चावल्याने लोकांना मलेरियासारखे रोग होतात. अशा सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी जमिनीत सांडपाणी जिरण्यासाठी परसबाग किंवा शोषखड्डा करता येतो.'' 
- शिवराज राठोड, ग्रामसेवक, बापार्डे 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: शुभमन गिलच्या कॅप्टन्सीबद्दल विराट कोहलीने स्पष्टच सांगितलं, 'अजूनही शिकतोय, तो दीर्घकाळ...'

NEET 2026: 'स्लो लर्नर' ते ऑल इंडिया रँक 1; सोडवले 10 हजारांपेक्षा जास्त MCQ! पाहा NEET PG टॉपरची भन्नाट यशोगाथा...

होमस्टेमध्ये २२ वर्षीय निमिषाचा मध्यरात्री मृत्यू, बॉयफ्रेंड आसिफला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Mumbai-Pune Accident: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर तिहेरी अपघात; कोल्हापुरच्या दोन तरुणांचा मृत्यू, एक गंभीर Video Viral

SCROLL FOR NEXT