कोकण

तहानलेल्या पक्षांना पाणी देता देता जपला छंद

अमोल टेंबकर

सावंतवाडी - मुक्‍या पक्ष्‍यांची तहान भागवत एक वेगळा अभ्यास आणि त्यातून नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न ओरोसमधील एका युवतीने केला आहे. पक्ष्‍यांना घराशेजारी असलेल्या उद्यानात पाणी पिण्यासाठी खास व्यवस्था करून दिली आहे. आजपर्यंत तिने तब्बल २४७ पक्ष्‍यांचे निरीक्षण नोंदवले आहे. भाग्यश्री परब, असे तिचे नाव असून तिचा छंद चर्चेला विषय बनला आहे.

मार्च महिना सुरू झाला की उन्हाच्या झळा प्रकर्षाने जाणवू लागतात. अंगाची होणारी लाहीलाही आणि त्यात पाण्याची टंचाई बघून जीव अगदी कासावीस होतो. गारवा राहावा यासाठी पंखा, एसी, कुलर आदींचा आधार घेतो. किंबहुना आपण या सोयी सुविधांमुळे सुखवस्तू जीवन जगत असतो. त्यामुळे पाण्याचे फारसे दुर्भिक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात तरी जाणवत नाही; पण या भूतलावर असणाऱ्या इतर सजीवांच काय? या हंगामात छोटे मोठे ओहोळ, डबकी, नद्यातील पाणी आटू लागते.

या वेळी अनेक पक्षी, प्राणी पाण्याच्या शोधात भटकतात. बऱ्याचदा हे पशुपक्षी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडेही येतात. उष्णतेमुळे कासावीस झालेल्या या पशुपक्ष्यांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागत. यामुळे त्यांची तहान भागविण्यासाठी ओरोस येथील उद्योन्मुख पक्षी अभ्यासक भाग्यश्रीने एक वेगळी शक्कल लढवली.

भाग्यश्रीचे घर जंगल भागाला लागूनच आहे. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर विविध प्रजातीच्या पक्ष्यांची नेहमीच रेलचेल असते. असचं एकदा भर दुपारी भाग्यश्री घरात बसली असताना तिने पक्ष्यांचा किलबिलाट ऐकला. नेमका काय प्रकार आहे हे बघण्यासाठी बाहेर आली असता काही पक्षी नळाच्या तोटीतून पडणारे थेंबथेंब पाणी आपल्या चोचीमध्ये टिपण्यासाठी खटाटोप करीत होते. तिने अंगणातला नळ चालू केला.

या नळातून पडणाऱ्या पाण्याने त्या पक्षाने तहान भागवली व मनसोक्त पाण्यामध्ये डुबक्‍याही मारल्या. हे पाहून या पक्षांची तहान कायमची कशी भागवता येईल, याविषयी ती विचार करू लागली. तिने बाजारात जाऊन सहा खोलगट मातीची भांडी विकत आणली. त्यातील दोन भांडी पाणी भरून विहिरीच्या कठड्यावर ठेवली तर चार भांडी घराच्या गच्चीवर ठेवली. दोन दिवस या भांड्यांकडे पक्षी फिरकले नाहीत. तिसऱ्या दिवशी एक लालगुडी बुलबुलचे दाम्पत्य त्या ठिकाणी आले; परंतु तेही भांड्याभोवती घिरट्या घालून निघून गेले.

चौथ्या दिवशी मात्र हे बुलबुल दाम्पत्य पाण्याच्या भांड्यांमध्ये मनसोक्त डुबक्‍या मारताना दिसले. त्यानंतर इतर पक्षीही या भाड्यांमधील पाणी पिण्यासाठी हजेरी लावत होते. यामध्ये दयाळ, लालबुड्या बुलबुल, शामा, पांढऱ्या भुवईचा बुलबुल, पिंगट पोटाचे सातभाई, कोकिळा, पांढऱ्या ठिपक्‍यांची नाचण, पानासारखा दिसणारा सोनकपाळी पर्णपक्षी, मानेवर ठिपके असणारा ठिपकेवाला होला म्हणजेच कवडा, पांढऱ्या छातीची पाणकोंबडी आदी प्रकारच्या पक्षांचा त्यात समावेश होता. 

पक्षी दारात येऊ लागल्यानंतर त्यांचा अधिवास, त्यांच्या खाण्यापिण्याच्या पद्धतीबद्दल उत्सुकता लागली. तसा शोध घेत असताना अनेकदा पक्ष्यांची घरटी पाहता आली. पक्षी घरटी कसे बांधतात याचेही निरीक्षण केले. ही माहिती गोळा करत असताना वैशिष्ट्यपूर्ण नोंदीही केल्या आहेत. 
- भाग्यश्री परब,
पक्षी अभ्यासक

‘बर्ड लाइफ ऑफ सिंधुदुर्ग’
आजतागायत केलेल्या पक्षी निरीक्षणातून आणि संकलित केलेल्या माहितीतून तिचे सहकारी वर्गमित्र प्रवीण सावंत व शिक्षक योगेश कोळी या तिघांनी एकत्रित येत सिंधुदुर्गातील पक्षांवरती ‘बर्ड लाइफ ऑफ सिंधुदुर्ग’ ही खूप सुंदर छायाचित्र व इतंभूत माहिती असलेले पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकांमध्ये पक्षांची छायाचित्रे व माहिती खूप सोप्या पद्धतीने 
मांडली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat News: ताम्हिणी घाटात प्रचंड वाहतूक कोंडी! पुणे-कोकण मार्ग बंद करण्याचा निर्णय, वाहनांच्या लांबच लांब रांगा

IND vs SA, 2nd Test: शुभमन गिल खेळला नाही, तर रिषभ पंतच्या नावावर होणार मोठा विक्रम! धोनीनंतर पहिल्यांदाच...

Solapur Election : अर्ज छाननीत पाच तासांचा थरार; कोंडूभैरी आणि कदम यांच्या भूमिकेवर नगराध्यक्ष निवडीचे समीकरण अवलंबून!

Kolhapur News: महायुतीतील मित्रपक्षांत धुसफूस, ‘इनकमिंग’वरून नाराजी; जागा वाटप फॉर्म्युला अनिश्चित

Umarga News : महायुती व महाविकास आघाडीचे आज चित्र स्पष्ट होणार; उमरगा व मुरुम पालिकेतील तडजोडीकडे सर्वांचे लक्ष!

SCROLL FOR NEXT