bhaskar jadhav, sadanand chavan sakal
कोकण

भास्कर जाधवांच्या निशाण्यावर आता सदानंद चव्हाण

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण करत गुहागरचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav)चिपळूण (Chiplun)तालुक्यात सक्रीय झाले. पहिल्याच मेळाव्यात त्यांनी सेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण (Sadanand Chavan)यांच्यावर निशाणा साधला. जाधव समर्थकांवर चव्हाणांकडून होणारी मिश्किल टोलेबाजीला जाधवांनी मेळाव्यात आक्रमकपणे उत्तर दिले.

आमदार भास्कर जाधव दोन वर्षापूर्वी शिवसेनेत दाखल झाले. मात्र, चिपळुणातील राजकारणापासून ते अलिप्त आहेत. येथे होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत सुद्धा त्यांचा सहभाग नसतो. जाधव चिपळुणात सक्रीय झाले तर कदाचित विधानसभेच्या जागेवर दावा करतील, या भितीने सेनेतील काही पदाधिकारी त्यांना चिपळूणपासून लांब ठेवत आहेत. मात्र, चिपळुणातील शिवसेनेच्या जुन्या कार्यकर्त्यांची काही महिन्यापूर्वी बैठक झाली. विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यातील शिवसेनेत मरगळ आली आहे. ती दूर करण्यासाठी आमदार भास्कर जाधव चिपळूणमध्ये सक्रीय झाले पाहिजेत, असे बैठकीत ठरले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जाधवांची भेट घेवून चिपळूणमध्ये लक्ष देण्याची मागणी केली होती.

पदासाठी शिवसेनेत येणाऱ्यांना पक्षाची दारे बंद आहेत. कुणीही पदासाठी शिवसेनेत येवू नये, असे सदानंद चव्हाण यांनी यापूर्वी सावर्डे परिसरात झालेल्या जाहीर कार्यक्रमात सांगितले होते. त्यांचा हा टोला आमदार भास्कर जाधव यांच्या समर्थकांसाठी होता. जाधव समर्थकांना पदावरून काढून टाकल्याचे फलकही काही ठिकाणी लागले होते. त्याचा समाचार आज भास्कर जाधवांनी मेळाव्यात घेतला.

..त्यांनी कोणता संघर्ष केला ?

२००४ मध्ये संपलेली शिवसेना आम्ही वाढवली, असे जाधव समर्थकांना हिणवले जाते. त्यावर भाष्य करताना आमदार जाधव यांनी कोळकेवाडीचे चंद्रकांत राणे, पोफळीचे चंद्रकांत सुवार यांना कसा संघर्ष करावा लागला. संघटनेसाठी त्यांनी कसे रक्त वाहिले याची उदाहरणे दिली. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या संघर्षाची माहिती कार्यकर्त्यांना दिली. पक्षात आणि हयात नसलेल्या कार्यकर्त्यांचा त्यांनी भाषण उल्लेख करून पक्षासाठी दिलेल्या योगदानाची आणि संघर्षाची माहिती दिली. २००४ नंतर ज्यांनी संघटना वाढली, त्यांनी कोणता संघर्ष केला असा सवालही आमदार जाधव यांनी विचारला.

राऊत यांचे त्यांनी कौतूक

कार्यकर्त्यांच्या प्रेमाखातर चिपळुणातील शिवसेनेच्या माजी आमदारावर आमदार जाधव यांनी टीका केली असली तरी खासदार विनायक राऊत यांचे त्यांनी कौतूक केले. लोकांच्या सतत संपर्कात राहणारा खासदार आपल्याला मिळाला आहे. विक्रांत जाधव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे तुमचे कोणतेही प्रश्न असू देत, जिल्हा परिषद आणि खासदार निधीतून ते मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार जाधव यांनी दिली.

मेळाव्याच्या निमित्ताने आली प्रचिती..

चिपळुणात सक्रीय होण्यासाठी आमदार जाधव यांनी सावर्डे गाव निवडले. त्यामुळे ते राष्ट्रवादी किंवा आमदार शेखर निकम यांच्याविरोधात काहीतरी बोलतील, अशी चर्चा होती. पण जाधवांनी आपल्याच पक्षातील माजी आमदारांवर त्यांचे नाव न घेता टीका केली. आपल्या समर्थकांवर अन्याय झाला तर भास्कर जाधव त्यांच्या बाजूने ठाम उभे राहतात. याचीच प्रचिती या मेळाव्याच्या निमित्ताने आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: ''पोरांनो, चला घरी! सोनम, खूप झालं भावा.. आता विषय वाढवू नको!'', सलमानने वांगचुक यांना दिली खास ऑफर

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Krishna River Project: कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाची प्रशासकीय मान्यता; रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम, पण नाही मिळाला 'मॅन ऑफ दी मॅच' पुरस्कार; श्रेयस अय्यर काय म्हणाला वाचा...

Birth Certificate Name Change Ban : जन्म-मृत्यू दाखल्यातील पूर्ण नावबदलाला मज्जाव; फक्त मात्रा, स्पेलिंग दुरुस्तीला परवानगी

SCROLL FOR NEXT