shivsena-ncp esakal
कोकण

पालिका निवडणुकीत 2 नेत्यांचे वारसदार आमनेसामने; चुरस वाढणार?

सर्वच राजकीय पक्ष स्वःबळाची तयारी करत असल्याने प्रत्येक प्रभागात उमेदवारांची गर्दी होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

सर्वच राजकीय पक्ष स्वःबळाची तयारी करत असल्याने प्रत्येक प्रभागात उमेदवारांची गर्दी होणार आहे.

चिपळूण : माजी आमदार रमेश कदम आणि विद्यमान आमदार तथा माजी मंत्री भास्कर जाधव या दोन नेत्यांचे वारसदार यावेळी पालिका निवडणुकीत उतरणार असल्याची उघड चर्चा सुरू आहे. त्यामुळे यावेळची निवडणूक लक्षवेधी ठरण्याची श्यक्यता आहे. शहरात पालिका निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. प्रत्येक पक्षाने निवडणुकांची तयारी सुरू केली असून उमेदवार चाचपणी सुरू करण्यात आली आहे. प्रभाग रचना आणि आरक्षणाबाबत अंदाज बांधले जात आहेत. त्यानुसार इच्छुकांची संख्याही वाढत आहे. आमदार जाधव यांचे सुपुत्र समीर जाधव यापूर्वी पालिका निवडणुकीत निवडून आले होते. परंतु आता ते थेट शिवसेनेचे धनुष्यबाण घेऊन निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे खात्रीशीर वृत्त असून शिवसैनिक देखील या वृत्ताला दुजोरा देत आहेत.

चिपळूणचे राजकारण आमदार भास्कर जाधव आणि माजी आमदार रमेश कदम यांच्या भोवती फिरत राहिले आहे. चिपळूण शहर माजी आमदार रमेश कदम यांचे होमपीच राहिले आहे. वर्षानुवर्षे त्यांनी येथील नगरपालिकेवर वर्चस्व ठेवले होते. परंतु गेल्या काही वर्षात कदमांची पकड ढिली होताना दिसत आहे. मात्र, यावेळी त्यांचे वारसदार अजिंक्य कदम प्रथमच राष्ट्रवादीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. शहरातील बहादूरशेख येथील एका सुरक्षित प्रभागातून ते आपले नशीब अजमावण्याची शक्यता आहे. समीर जाधव त्यांचा बालेकिल्ला असलेल्या पाग येथील प्रभागातून पुन्हा एकदा मैदानात उतरणार आसल्याची चर्चा आहे.

दोन्ही बाजूने गुप्तता, तरी..

चिपळुणात सर्वच राजकीय पक्ष स्वःबळाची तयारी करत असल्याने प्रत्येक प्रभागात उमेदवारांची गर्दी होणार आहे. बहुतांशी निवडणुकीत चौरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. आता आमदार भास्कर जाधव व माजी आमदार रमेश कदम यांचे वारसदार या निवडणुकीत उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दोघांनी आपले सुरक्षित वार्ड शोधण्यास सुरवात केली असली तरी राजकीय विरोधक असलेले दोन नेत्यांचे प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागणार आहे. दोन्ही बाजूने याबाबत गुप्तता पाळली जात असली तरी चिपळुणात या विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT