The Biggest Underground Way Work At Kashedi Mumbai Goa Route  
कोकण

मुंबई गोवा मार्गावर येथे होतोय सर्वात मोठा भुयारी मार्ग

सकाळवृत्तसेवा

खेड ( रत्नागिरी ) - कशेडी घाटात भोगाव ते खवटीपर्यंत भुयारी मार्ग खोदण्याचे काम सुरू आहे. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हा सर्वात मोठ्या लांबीचा भुयारी मार्ग असणार आहे. खोदण्यासाठी एक अत्याधुनिक यंत्र बुमर वापरण्यात येत असून याद्वारे तीन ते चार मीटर लांबीचे कातळ फोडले जात आहेत. 20 मीटर रुंदी आणि 6.5 मीटर उंची अशा पद्धतीने भुयाराचे खोदकाम करण्यास बुमर यंत्राचा उपयोग होत आहे. भुयारामध्ये महत्वाच्या ठिकाणी सुरुंग स्फोटासाठी जिलेटिनचा वापर होत असून भुयारामध्ये पडलेले कातळ व मोठमोठे दगड बाहेर काढण्यासाठीही यंत्राचा वापर केला जात आहे. 

राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम उपअभियंता प्रकाश गायकवाड यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, कातळाचे फोडलेले दगड महामार्गाच्या चौपदरीकरण कामांमध्ये वापरण्यात येत असून दोन्ही भुयारी मार्ग एकमेकांपासून वेगवेगळे असतील. कशेडी घाटातील प्रवासाचे अंतर या भुयारी मार्गामुळे सुमारे 4.5 किलोमीटरने कमी होण्याची शक्‍यता आहे तसेच वाहनचालकांना कशेडी घाटातून धोकादायक वळणावरून गाडी चालवताना संभाव्य धोका यामुळे कमी होणार आहे. कशेडी घाटात दरड कोसळल्यामुळे घाट रस्ता बंद ठेवण्याच्या घटनादेखील टळणार आहेत. 

खवटी येथून पावसाळ्यापूर्वीच भूयारी मार्गाचे काम सुरू झाले. राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या भुयारी मार्गाचे अवलोकन केले होते. आजमितीस साधारणपणे 200 मीटर अंतराचा भुयारी मार्ग झाला आहे. काम पूर्ण होईल तेव्हा 1.84 किलोमीटर भुयारी मार्ग कशेडी घाटाला पर्याय म्हणून पूर्ण झाला असेल. 

दुतर्फा ऍप्रोच रस्ते करण्याची गरज 

2019 साली नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू झालेले हे काम एप्रिल 2021 पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक नवले यांनी व्यक्त केली. या कामासाठी सुमारे 200 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या भुयारी मार्गाच्या दुतर्फा ऍप्रोच रस्ते करण्याची गरज आहे. 441 कोटी रुपये या भूयारी मार्गाचा एकूण खर्च आहे, अशी माहितीही दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Success Story: मित्रांची साथ ठरली निर्णायक… सर्व रूममेट बनले अधिकारी… सुरज पडवळ यांची राज्य सेवेत क्लास-वन पदावर निवड

Latest Marathi News Live Update : मुंबईतील सत्याच्या मोर्चाच्या ठिकाणी महाआघाडीतील नेते उपस्थित

Kolhapur Politics : कोल्हापूर महापालिकेत नकारात्मक काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी घेतलं चांगलचं फैलावर, आयुक्तांनाही सुनावत आबिटकर म्हणाले...

'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाने पहिल्या दिवशी किती केली कमाई? तब्बल इतक्या कोटींचं आहे बजेट

श्रीमंतीचा दिखावा की कलाकृतीचा संदेश? शुद्ध सोन्यापासून घडवलेल्या 'टॉयलेट'ची जगात चर्चा, ट्रम्प यांना देऊ केले होते Toilet; किती किंमत?

SCROLL FOR NEXT