BJP Alleges That Work Of Devrukh ST Employees Under Stress 
कोकण

देवरूख एसटी कर्मचाऱ्यांचे  काम तणावाखाली असल्याचा भाजपचा आरोप

सकाळवृत्तसेवा

साडवली ( रत्नागिरी ) - एस. टी. आणि बेस्ट प्रशासनाने भत्ते न दिल्याने वैतागलेल्या देवरूख आगाराच्या एका कर्मचाऱ्याचा आत्महत्या करतो, असा व्हिडीओ व्हायरल झाला. कर्मचारी जर मानसिक तणावात काम करत असतील, तर प्रशासनाने तातडीने कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. यातून प्रशासनाचा हलगर्जीपणासमोर आला असून, कोणतीही दुर्घटना घडल्यास आगारप्रमुख आणि पालकमंत्री जबाबदार असतील, असा इशारा प्रमोद अधटरावांनी दिला. 

देवरुख आगारात भाजप शिष्टमंडळाने भेट दिली. आगारप्रमुखांशी चर्चा करताना बेस्टसाठी 52 कर्मचारी देवरूखातून पाठवले आहेत,त्यामुळे कर्मचारी कमी झालेत. सगळा ताण येथील कर्मचाऱ्यावर पडला असून, ही अवस्था महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या धोरणामुळे निर्माण झाली आहे.

मुंबईतून कर्मचाऱ्यांना 17 दिवसांनंतर पैसे दिले गेले नाही, अजुनही तो कर्मचारी देवरूखला आलेला नाही, आगर व्यवस्थापक यांचा फोन उचलत नाही, ही दयनीय अवस्था निर्माण झाली आहे, हे निदर्शनास आणले. एस. टी. प्रशासन रसातळाला गेलेले असून, पालकमंत्री अनिल परब हे आपला मुंबईतील मतदारसंघ सांभाळण्यावर भर देत आहेत,

रत्नागिरीकडे पूर्ण पाठ फिरवली आहे. त्यामुळे ही नामुष्कीची वेळ आलेली आहे, असा आरोप तालुकाध्यक्ष अधटराव यांनी केला. परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन बेस्टसाठी एस. टी. कामाला लावली आहे.

कोकणातील प्रवाशांना परब यांनी वेठीस धरले आहे. यामुळे कोकणातील एस टी. प्रवासी बस नाही म्हणुन वैतागलेला आहे. देवरुख आगारात मुळातच चालक वाहक कमी आहेत त्यातील 52 मुंबईला पाठवल्याने ग्रामीण भागातील फेऱ्यांवर परीणाम झाला आहे. विभाग नियंत्रकांना हे कळले पाहिजे, असे मत अधटराव यांनी व्यक्त केले 

यावेळी मुकुंद जोशी, नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष सुशांत मुळ्ये, अभिजीत शेट्ये, भगवतसिंह चुंडावत, सुरेंद्र माने, यशवंत गोपाळ, प्रथमेश धामणस्कर आदी उपस्थित होते. 

तीव्र आंदोलनाचा इशारा 
देवरूख आगारातील वाहतूक नियंत्रक प्रवाशांना उद्धट उत्तरे देतात, वेळेवर बसफेऱ्या सुटत नाही, कर्मचारी पगार वेळेवर होत नाही, स्वच्छतेच्या तक्रारी असतात, वाहतुकीचे नियोजन नाही, या सर्वांचा परिणाम म्हणून नागरिकांना नाहक त्रास होत असून, आगारप्रमुख सर्वस्वी जबाबदार आहेत. तक्रारींचे निरसन न झाल्यास भाजप तीव्र आंदोलन करेल, असे सांगण्यात आले. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : पंचगंगा नदीची पाणी पातळी चोवीस तासांत सहा फूट सहा इंचांनी वाढली

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT