जिल्हा परिषद मतदारसंघ  sakal
कोकण

कुडाळात शिवसेनेसमोर भाजपचे कडवे आव्हान

तालुक्यात या वेळी दहा जिल्हा परिषद मतदारसंघ होण्याची शक्यता

अजय सावंत

कुडाळ: तालुक्यात या वेळी दहा जिल्हा परिषद मतदारसंघ होण्याची शक्यता असून, खऱ्या अर्थाने या ठिकाणी शिवसेना विरुद्ध भाजप, अशी ‘काँटे की टक्कर’ होण्याची शक्यता आहे. पाच ते दहा वर्षांचा कालावधी पाहता कुडाळ तालुका शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र, या वेळी हा किल्ला अबाधित ठेवण्यासाठी शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांना प्रचंड मेहनत करावी लागणार, हे तेवढेच

जिल्हा परिषदेचे पाच जिल्हा परिषद मतदारसंघ वाढणार असून, यामध्ये कुडाळ तालुक्यात एक मतदारसंघ वाढण्याची शक्यता आहे. कुडाळ तालुक्यात पिंगुळी, नेरूर, वेताळ-बांबर्डे, आंब्रड, पावशी, तेंडोली, माणगाव, ओरोस, घावनळे असे नऊ जिल्हा परिषद मतदारसंघ येतात. मागील पाच वर्षांचे चित्र पाहता या ठिकाणी शिवसेनेचे सहा तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले होते. या भागाचे नेतृत्व शिवसेनेच्या माध्यमातून खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून सुरू आहे. त्यांनी पाच वर्षांच्या कालावधीत विकासाचा धडाका लावताना कोट्यवधीचा निधी विकासकामांसाठी आणला, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही; मात्र तेवढ्याच ताकदीने भाजप कुडाळ तालुक्यात आपले वर्चस्व निर्माण करू पाहत आहे. मिनी विधानसभेच्या माध्यमातून अस्तित्व टिकविण्यासाठी शिवसेनेला धडपड करावी लागणार आहे,

तर भाजप या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्तित्व निर्माण करण्यासाठी निश्चितच कार्यरत राहणार आहे, हे तेवढेच सत्य आहे. शिवसेनेकडून जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, जिल्हाप्रमुख संजय पडते, अमरसेन सावंत, वर्षा कुडाळकर हे दिगग्ज नेते, तर भाजपच्यावतीने रणजित देसाई, लॉरेन्स मान्येकर हे दिगग्ज उमेदवार रिंगणात उतरले व त्यावेळी ते विजयी झाले होते. अलीकडेच झालेल्या एकंदर निवडणुकीचा विचार करता, कुडाळ नगरपंचायत, जिल्हा बँक किंवा विविध सोसायटी निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने जिल्ह्यात आपले वर्चस्व निर्माण केले आहे. विविध सोसायट्या ताब्यात घेतल्या आहेत. राज्यात शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात महाविकास आघाडी आहे. जिल्हा परिषद मतदारसंघात एखाद्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस युती करतील, मात्र राष्ट्रीय काँग्रेस युती करेल का? याबाबत अद्याप काहीही निष्पन्न झालेले नाही. येथील नगरपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये आघाडी होती; पण काँग्रेस आघाडीपासून दूर राहिले होते. त्यानुसार नगरपंचायतीचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय काँग्रेस दहाही जिल्हा परिषद मतदारसंघात उमेदवार उभे करतील, हे निश्चित आहे. खासदार राऊत, पालकमंत्री सामंत, आमदार नाईक यांनी राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून काही महिन्यात विकासाच्या कामाबाबत आणलेला कोट्यवधीचा विकास निधी हा निश्‍चितच विकासाला प्रेरणा देणारा आहे; मात्र जिल्हा परिषद मतदारसंघात अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी शिवसेनेला निश्चितच शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.

केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे व पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यरत असून या ठिकाणी महिला उमेदवार देताना ते स्वत: निर्णय घेणार की राणे समर्थक आणि जुने भाजप कार्यकर्ते एकत्र येऊन निर्णय घेतात, हे तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway : पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी! नांदेड आणि हरंगुळ एक्स्प्रेस गाड्या २६ जानेवारीपासून हडपसरवरून सुटणार, पहा नवीन वेळापत्रक

IPL 2026: राजस्थान रॉयल्सला मिळाली द्रविडची रिप्लेसमेंट! जडेजाला संघात घेतल्यानंतर जाहीर केला मोठा निर्णय

Latest Marathi Breaking News : बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी निश्चित

Mumbai Crime: अंधेरीत विद्यार्थ्याला श्वानासोबत संबंध ठेवायला भाग पाडलं, ब्लॅकमेल करत बळजबरीनं लिंगबदल करायला लावलं; तृतीयपंथीयांकडून अत्याचार

Pune Cyber Fraud : पुण्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; पार्टटाइम जॉब आणि शेअर ट्रेडिंगच्या नावाने ९८ लाखांची फसवणूक

SCROLL FOR NEXT