prasad lad sakal
कोकण

प्रसाद लाड यांचे पोलीस ठाण्यात आंदोलन; राणे समर्थक आक्रमक

अर्चना बनगे

संगमेश्वर: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर संगमेश्वर मधील राणे समर्थक आक्रमक झाले आहेत. नारायण राणे यांची सुटका होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार अशी भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

साहेबांना सोडा, साहेबांना तुम्ही मारणार आहात. त्यांच्या जीवाला धोका आहे. आम्हाला एसपींना भेटू द्या. आम्हाला आदेश दाखवा नाहीतर येथे उपोषणाला बसू. असा पवित्रा भाजप नेते प्रसाद लाड यांनी पोलिस ठाण्यातच घेतला. नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर त्यांच्यासोबत त्यांचे दोन्ही मुले पोलीस ठाण्यातच आहेत.

यावेळी कोणत्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. आम्हाला विचारण्याचा अधिकार आहे की नाही, आम्हाला आदेश दाखवा. असे निलेश राणे म्हणाले.संगमेश्वर मध्ये रस्त्यावर भाजपचे समर्थक उतरले आहेत. रत्नागिरीत कोणालाही जाऊ देणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. जोपर्यंत त्याची सुटका होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार अशी भूमिका राणे समर्थकांनी घेतली आहे.

यावेळी प्रसाद लाड म्हणाले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नुसतेच बसवून ठेवले आहे. ना कुठली कारवाई करत आहेत ना कसली माहिती देत आहेत. गोळवली प्रकल्पात नारायण राणे यांना पोलिसांनी भरल्या ताटावरून जेवताना अर्धवट उठवले. ज्या अधिकाऱ्यांनी एफआयआर केला असे सांगितले जाते, ते पोलिस स्थानकात उपस्थित नाहीत. पोलिस सहकार्य करत नसल्याने आता पोलीस ठाण्यात उपोषणाला बसणार असे ही म्हणाले. नारायण राणे यांची सुटका होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raireśhwar Fort Incident VIDEO : रायरेश्वर किल्ला परिसरात दारू पार्टी करणाऱ्या परप्रांतीय तरूणांना शिवप्रेमींकडून चोप!

Ambulance Fire : मध्यरात्री लातूरकडे जाताना ॲम्बुलन्स जळून खाक! डॉक्टरांनी दाखवले प्रसंगावधान, महिलेचा जीव वाचला

Lonar News : समृद्धी महामार्गावर मोठी कारवाई! संशयास्पद कंटेनर चालकाजवळ आढळले देशी पिस्तूल व जिवंत काडतुसे

PM Kisan Yojana News: पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याबाबत नवीन अपडेट; जाणून घ्या, २००० रुपये कधी येणार?

Dharur Police : दिवाळीच्या गर्दीत हरवलेली पर्स पोलिसांच्या तत्परतेमुळे परत मिळाली; एकग्राम सोने व नगद केली परत

SCROLL FOR NEXT