रत्नागिरी - ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत किती ठिकाणी भारतीय जनता पक्ष किती उमेदवार देतो, हे पाहणे रोचक ठरणार आहे. गेल्या 20 वर्षांत विधानसभा निवडणुकीत पराभव व तालुक्यात 5 सरपंच आणि 20-25 सदस्य आहेत. त्यामुळे विद्यमान निवडणुकीत भाजपला गमावण्यासारखे काही नाही.
भाजपचा इतिहास पाहता 20 वर्षे भाकरी न पलटल्याने भाजपची स्थिती नगण्य झाली. भाजप आमदार कुसुमताई अभ्यंकर, शिवाजीराव गोताड, बाळ माने, अशोकराव मोडक, संजय केळकर, निरंजन डावखरे अशा लोकप्रतिनिधींनी अधिराज्य केले. मात्र गेल्या 20 वर्षांत बाळ मानेंचा सलग तीन वेळा पराभव झाला. मात्र भाजपच्या वरिष्ठांनी पराभूत असलेल्या माने यांच्याकडेच रत्नागिरीचे नेतृत्व कायम ठेवले.
विधानसभेबरोबरच पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायती यामध्ये भाजपचा सातत्याने पराभव झाला. तालुक्यात फक्त 6 ग्रामपंचायती व राजापूर, लांजा, देवरुखमध्ये 5 सरपंच भाजपचे आहेत.
माने यांनी भाजपचा चेहरा बहुजन करण्याचा प्रयत्न केला. परंतु मूळ भाजपधार्जिणे कार्यकर्ते या 20 वर्षांत पक्षापासून दुरावले. भाजपची ग्रामीण भागातील पकड सुटली. दीर्घ काळ भाजपचे नेतृत्व बाळ माने यांच्याकडे होते. शिवसेनेबरोबरची युती, सेनाधार्जिणे धोरण यामुळे गेल्या 20 वर्षांत भाजप अधिक दुर्बल होत गेला. बाळ माने, अशोक मयेकर, सतीश शेवडे, नाना शिंदे आदींच्या नेतृत्वाखाली भाजपची लोकप्रियता फार अग्रेसर झाली नाही.
विद्यमान भाजप जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांच्या रूपाने एक नवीन चेहरा भाजपने दिला. पण ही चाल अत्यंत उशिरा खेळली गेली. भाजपचे जुने कार्यकर्ते असलेले पटवर्धन हे सहकार, बॅंकिंग क्षेत्रात अग्रेसर आहेत. राजकारणातल्या चाली खेळण्यात ते कितपत यशस्वी होतील, ते पाहावे लागेल. त्यांनी धुरा सांभाळल्यानंतर अनेक जुने-जाणते पदाधिकारी, कार्यकर्ते हे कार्यरत झाल्याचे चित्र आहे. कार्यकारिणीतही प्रथितयश, वजनदार असलेल्या चेहऱ्यांचा समावेश आहे. भाजपचे झालेले कार्यक्रम, आंदोलनही चांगल्या उपस्थितीत झाल्याचे चित्र भाजपची रणनिती यशस्वी होत आहे.
लक्ष वेधण्यासाठी गट-तट
भाजपमध्ये गट-तट आहेत, अशा बातम्या जाणीवपूर्वक पसरवून लोकांचे लक्ष वेधण्याची खेळी केली जात आहे. गट, तट करण्याएवढी कुवत, ताकद रत्नागिरी भाजपमध्ये खरेतर नाही. अलीकडच्या काळात सत्ता येऊनही भाजपाचे संघटन मजबूत झाले नाही. याची जबाबदारी नेमकी कोण घेणार,याचे उत्तर कोणी देत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.