BJP Rule In Sindhudurg ZP At Any Cost 
कोकण

'कोणत्याही परिस्थितीत 'येथे' भाजपचाच झेंडा'

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांना व्हीप बजावून दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. याला घाबरण्याची गरज नाही. कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर भाजपचाच झेंडा फडकणार, असा विश्‍वास भाजप प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी आज येथे व्यक्त केला.

येथील माजी खासदार निलेश राणे यांच्या संपर्क कार्यालयात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना श्री. तेली बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजप नेते संजू परब, सभापती पंकज पेडणेकर, रविंद्र मडगावकर, नगरसेवक सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, मनोज नाईक, मागासवर्गीय सेल जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.

एक प्रकारे सदस्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू

श्री. तेली म्हणाले, ""सावंतवाडी तालुक्‍यात भाजप वाढवण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने एकदिलाने काम करावे. आपापसातील हेवेदावे बाजूला ठेवून काम केल्यास आगामी निवडणुकीतही यश खेचून आणू शकतो. आज कॉंग्रेसच्या निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्य तसेच जिल्हा परिषद सदस्यांना कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्याकडून व्हीप बजावण्यात आला आहे. या माध्यमातून एक प्रकारे सदस्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असून कोणत्याही सदस्याने या प्रकाराला घाबरून जाऊ नये. त्यांनी कितीही प्रयत्न केल्यास दोन्ही ठिकाणी भाजपचीच सत्ता स्थापन होणार असुन त्यांच्या दबावाला एकही सदस्य बळी पडणार नाही.''

भाजपच्या कोअर कमिटीची बैठक​ होईल 

यावेळी होऊ घातलेल्या आंबेगाव व बांदा ग्रामपंचायत पोटनिवडणुक तसेच सावंतवाडी नगराध्यक्ष निवडणुकीबाबतही चर्चा करण्यात आली. लवकरच याठिकाणी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होऊन निवडणुकीबाबत कार्यकर्त्याना योग्य मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचेही यावेळी तेली यांनी स्पष्ट केले.यावेळी उपसभापती संदीप नेमळेकर, पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण सावंत, मानसी धुरी, अक्षता खडपे, श्रृतिका बागकर, निकीता सावंत, जिल्हा परिषद सदस्य उन्नती धुरी, शर्वाणी गावकर, शेखर गावकर, अक्रम खान, विनोद राऊळ, जावेद शेख, राजू परब, उदय धुरी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Semi Final : हे, बरोबर नाय...! Smriti Mandhana अम्पायरवर नाराज झाली, ऑस्ट्रेलियाची चतुराई की भारताचं दुर्भाग्य?

Jio offers: जिओ ग्राहकांना खुशखबर! 35 हजार रुपयांची मोफत सेवा मिळणार; सुरुवातीला 'याच' ग्राहकांना फायदा

Vande Bharat Sleeper Train: आनंदाची बातमी! देशातील पहिली वंदे भारत स्लिपर ट्रेन रुळांवर लवकरच धावणार, अखेर रेल्वेकडून मान्यता

Justice Suryakant India’s New Chief Justice : न्यायमूर्ती सूर्यकांत असणार भारताचे नवे सरन्यायाधीश! राष्ट्रपतींनी केली नियुक्ती

Latest Marathi News Live Update : मोहोळ पोलीस ठाण्याच्यावतीने रन फॉर युनिटी उपक्रम

SCROLL FOR NEXT