Boats from Gujarat came to Devgad due to bad weather 
कोकण

वातावरणात बदल, गुजरातच्या नौकांनी घेतला देवगडचा आश्रय

संतोष कुळकर्णी

देवगड (सिंधुदुर्ग) - अचानक बरसलेला पाऊस, तसेच समुद्रातील खराब हवामान यामुळे पुन्हा येथील मच्छीमारी थंडावली आहे. सर्वार्थाने सुरक्षित समजल्या जाणाऱ्या येथील देवगड बंदरात गुजरातमधील सुमारे शंभरभर मच्छीमारी नौका आश्रयाला आल्या आहेत. रात्रीपासून किनारपट्टीवर पावसाने जोर धरल्याने मच्छीमारी नौका आश्रयासाठी बंदरात आल्या. त्यामुळे स्थानिक सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली असून नौकांची तपासणी सुरू होती. 

दोन दिवसांपासून किनारपट्टीवर वातावरण खराब आहे. अधूनमधून पाऊस होत आहे. त्यातच रविवारी दुपारपासून वातावरणात एकदमच बदल झाला. आज सकाळपर्यंत 24 तासांत येथे 8 मिलिमीटर (एकूण 3416 मिलिमीटर) इतकी पावसाची नोंद झाली; मात्र आज सकाळी येथे दमदार पावसाच्या सरी कोसळल्या. खराब हवामानामुळे स्थानिक मच्छीमारी नौकांसह बाहेरील राज्यातील मच्छीमारी नौका आश्रयासाठी येथील बंदरात आल्या आहेत.

या नौकांपैकी 83 नौकांची तपासणी झाली आहे. त्यावर एकूण 712 मच्छीमार आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत तपासणी सुरूच होती. सागरी पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र साळुंखे यांनी नौकांची तपासणी केली. यावेळी पोलिस उपनिरीक्षक विक्रांत कुंभार, सहायक पोलिस उपनिरीक्षक नीलेश पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रेमनाथ टेकाळे, महिला पोलिस नाईक अमृता बोराडे उपस्थित होते. मच्छीमारांनी मासेमारीस जाण्याचे टाळावे, असे आवाहन केले जात आहे. 

वेगवान वाऱ्याची शक्‍यता 
खराब हवामानामुळे स्थानिक मच्छीमारी धीम्या गतीने सुरू आहे. पावसाळी वातावरणामुळे छोट्या नौकाधारकांनी समुद्रात मासेमारीसाठी जाणे टाळले. येथील बंदरात नौकांची गर्दी झाली होती. किनारपट्टीवर उद्यापर्यंत ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची तसेच काही भागांत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : बाजीराव रोडवरील हत्या प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींना अटक; तिघेही अल्पवयीन

Satara Municipal Election: मराठ्यांच्या राजधानीत हवा मराठाच नगराध्यक्ष?; साताऱ्यात दाेन्ही राजेंकडून मनोमिलनाचे संकेत मिळताच चर्चांना उधाण

माेठी बातमी! 'महाबळेश्वर तालुक्यातील छमछमवर पाेलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा; बंगल्यावरील धक्कादायक प्रकार उघडकीस..

Ramraje Naik-Nimbalkar: नार्को चाचणी त्यांची त्यांनीच करावी: रामराजे नाईक-निंबाळकर; एकाही घटनेच्या मागे मी आहे, सिद्ध करून दाखवा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना देणार भेटी

SCROLL FOR NEXT