Bolbhasha Tal konKan Tourism Institute Will Awake History of revolution in Degve 
कोकण

डेगवेतील क्रांतीचा इतिहास जागृत करणार बोलभाषा, तळकोकण पर्यटन संस्था

निलेश मोरजकर

बांदा ( सिंधुदुर्ग ) - इंग्रज राजवटीविरुद्ध देशात पहिली क्रांती 1857 मध्ये झाली. मात्र डेगवे (ता. सावंतवाडी) येथील केशव गोविंद गवस - देसाई या क्रांतिकारकाने 1844 मध्ये बांद्यात पहिला इंग्रज अधिकारी लॉर्ड विल्यम फावरे (22) याला जीवे मारून इंग्रजांविरुद्धच्या पहिल्या क्रांतीची नोंद केली. मात्र या क्रांतिकारकाच्या पराक्रमाची इतिहासात कुठेही नोंद आढळत नाही.

बांदा शहरात गजबजलेल्या कट्टा कॉर्नर चौकात फावरे यांचे थडग झाडाझुडपांच्या विळख्यात अखेरची घटका मोजत आहे. जुलमी इंग्रज अधिकाऱ्याला यमसदनी पाठवून केलेल्या पराक्रमाचे स्मारक व त्या अनुषंगाने केशव गवस - देसाई यांचा पराक्रम देखील कालौघात नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. डेगवे येथील बोलभाषा आणि तळकोकण पर्यटन संस्थेने हा इतिहास पुढील पिढीला समजावा यासाठी हे स्मारक स्वखर्चाने जतन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोकणातील अनेक स्वातंत्रसैनिक, क्रांतिकारकांनी भारताच्या स्वतंत्र लढ्यात मोलाची भूमिका बजाऊनही त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव झाला नाही. इंग्रजांविरुद्ध देशात पहिली क्रांती 1857 मध्ये झाली. या स्वातंत्रसंग्रामातील एक सुवर्ण पान डेगवे गावाच्या नावावर आहे.

1857 पूर्वी तेरा वर्षे आधी म्हणजेच 1844 मध्ये जुलमी इंग्रज अधिकारी लॉर्ड विल्यम फावरे यांचा डेगवेचे सुपुत्र केशव गोविंद गवस - देसाई यांनी गोळ्या घालून वध केला. बांदा येथे घडलेल्या या क्रांतिकारकाच्या पराक्रमाची इतिहासात कुठेही नोंद आढळत नाही. फावरे यांचे स्मारकच इतिहासाची साक्ष आहे. 29 मार्च 1857 मध्ये क्रांतिकारक मंगल पांडे यांनी बराकपूरच्या छावणीत बॉम्बस्फोट घडवून स्वतंत्र लढ्याची पहिली ठिणगी पडल्याची नोंद इतिहासात आहे.

त्यामुळे गवस-देसाई हे एका इंग्रज अधिकाऱ्याला मारणारे पहिले क्रांतिकारक ठरू शकतात. त्यांची समाधी शहरातील कट्टा कॉर्नर चौकात असून त्यावर 1844 साल असा उल्लेख आहे. त्या जुलमी इंग्रज अधिकाऱ्याचे थडग्याच्या रुपात स्मारक उभारण्यात आले; पण देशभरात पहिल्यांदा क्रांतीची ठिणगी पेटविणाऱ्या गवस-देसाई यांचे स्मारक सोडाच, पण त्यांचे इतिहासात नाव देखील झाले नाही. 

लॉर्ड विल्यम फावरे हा इंग्रज अधिकारी 31 डिसेंबर 1844 ला 25 सहाय्यक अधिकाऱ्यांना घेऊन बांदा भागातील स्वातंत्र्य सैनिकाना पकडून नेण्यासाठी येत होता. त्यावेळी गवस - देसाई यांनी कट्टा कॉर्नर येथील झाडीतून गोळीबार करत त्याला ठार केले. फावरे हा जागीच ठार झाला. वरिष्ठ अधिकाऱ्याला एका खेड्यातील तरुणाने अशा पद्धतीने ठार केल्याने सरकार खळवळून उठले व पॉलिटिकल एजंट जॉन्सन यांना मारेकरी जिवंत अथवा ठार करून आमच्या स्वाधीन करावे व बक्षीस न्यावे, असे फर्मान सोडले. त्यावेळी ईस्ट इंडिया कंपनीच्या मुखपत्रात ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. 

इंग्रज शासनाला काही केल्या हा क्रांतिकारक सापडत नव्हता. इंग्रजांनी त्यामुळे येथील निष्पाप जनतेस छळण्यास सुरुवात केली. हा छळ सहन न झाल्याने येथीलच श्री हळदणकर-नाईक यांनी स्वतः पुढे येऊन आपण गोळ्या झाडल्याचे सांगितले. त्यांना डेगवे येथे काजऱ्याच्या झाडावर फासावर चढविण्यात आले. फावरे यांचे स्मारक सध्या झाडाझुडपांनी वेढले आहे व ते मोडकळीस आले आहे. या स्मारकाकडे विशेष देखभाल न झाल्याने ते कोसळण्याच्या मार्गावर आहे. हे स्मारक पडल्यास गवस-देसाई यांचा पराक्रमही काळाच्या पडद्याआड जाणार आहे. 

""शासनाच्या उदासीन धोरणामुळे मोडकळीस आलेली लॉर्ड फावरे यांची स्मारक साफसफाई करून हा इतिहास नवीन पिढीसमोर पुन्हा जिवंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करूनही या ऐतिहासिक स्मारकाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. यासाठी आम्ही स्वखर्चाने या स्मारकाची साफसफाई करून इतिहासाचा हा ठेवा पर्यटन संस्थेच्या माध्यमातून जतन करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील पिढीला या माध्यमातून हा इतिहास नव्याने शिकायला मिळणार आहे.'' 
- नम्रता देसाई, अध्यक्ष, बोलभाषा गोवा आणि तळकोकण पर्यटन संस्था. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police constable molests student on train Video : रेल्वेत झोपेचं सोंग घेवून शेजारी बसलेल्या विद्यार्थीनिचा विनयभंग करणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबलला अटक!

Pune News : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीला ईपीएफओचा दणका; १२० कोटी ९० लाख रुपये पीएफ भरण्याचे आदेश!

Karad Crime : कराडमध्ये पोलिसांच्या ताब्यातील आरोपी बेड्यांसह पसार; पुणे-बंगळूर महामार्गावर खळबळ!

Aravalli Case: अरावली वाचवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय! नवीन खाण परवान्यांवर बंदी; उद्योगाला मोठा झटका

Vijay Hazare Trophy : वैभव सूर्यवंशीच्या १९० धावा; रोहित शर्माच्या १५५ अन् विराट कोहलीच्या १३१ धावा! बघा ३ शतकांचा ५ मिनिटांचा Video

SCROLL FOR NEXT