Break To Anganwadi Recurtment In Sindhudurg Marathi News
Break To Anganwadi Recurtment In Sindhudurg Marathi News 
कोकण

सिंधुदुर्गात अंगणवाडी पद भरती रखडली 

सकाळवृत्तसेवा

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - सिंधुदुर्गात अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांची 50 टक्के पदे भरण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत; मात्र याचा प्राधान्यक्रम स्पष्ट न झाल्याने ही भरती रखडल्याची माहिती आजच्या महिला व बाल विकास समिती सभेत देण्यात आली. 

जिल्हा परिषद महिला व बाल विकास समिती सभा येथील बॅ नाथ पै समिती सभागृहात सभापती माधुरी बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. समिती सचिव तथा प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाक) अमोल पाटील, समिती सदस्या संपदा देसाई, सायली सावंत, श्‍वेता कोरगावकर, पल्लवी झिमाळ, वर्षा कुडाळकर, तालुका बाल प्रकल्प अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास समिती सभापती पदी बांदेकर यांची निवड झाल्यानंतर आज त्यांच्या अध्यक्षतेखाली पहिलीच तहकूब सभा आयोजित केली होती. 11:30 ची सभा असल्याने अधिकारी खातेप्रमुख आदी वेळीच सभागृहात उपस्थित होते. तर सभापती व अन्य सदस्य सभापती यांच्या दालनात उपस्थित होते; मात्र सभापती आणि सदस्य तब्बल एक तास उशिराने सभागृहात दाखल होत सभेचे कामकाज पूर्ण केले; मात्र सभापती बांदेकर यांनी पहिलीच सभा विलंबाने सुरु केल्याने सभेला उपस्थित असलेल्या तालुका आणि जिल्हा स्तरावरील अधिकारी कर्मचाऱ्यांना एक तास ताटकळत रहावे लागले.

आपला कामाचा एक तास वाया गेला अशी कुजबुज सुरु होती. 
रिक्त असलेल्या मदतनीस आणि मिनी सेविका यांची 50 टक्के पदे भरण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत; मात्र या 50 टक्‍क्‍यांमध्ये प्राधान्याने कोणती पदे भरावित याबाबत मार्गदर्शन नसल्याने ही पदे भरलेली नाहीत. आयुक्तांकडून यावर मार्गदर्शन मिळताच पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. अंगणवाडी इमारत भाड्यात वाढ करण्यात आली असल्याची माहिती सभेत सचिव पाटील यांनी दिली. रिक्त पदांमध्ये अंगणवाडी सेविका 51, मदतनीस 74 तर मिनी अंगणवाडी सेविका 17 पदे रिक्त आहेत. 1596 अंगणवाडी पैकी 479 अंगणवाडींना स्वतःची इमारत नसल्याची माहिती सभेत देण्यात आली. 

महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी यासाठी महिला व बाल विकास विभागामाफत फळ प्रक्रिया प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण देण्यासाठी प्रस्ताव मागविले होते. यात दोन प्रस्ताव प्राप्त होते. यात कोल्हापुर येथील संस्थेचे दर कमी होते; मात्र त्या संस्थेकडे नोंदणी प्रमाणपत्र नसल्याने त्या संस्थेला अपात्र ठरवून वेंगुर्ले तालुक्‍यातील संस्था निश्‍चित केल्याची माहिती सभेत देण्यात आली. 

आठ तालुक्‍यातील प्रत्येकी 60 लाभार्थ्यांना कराटे प्रशिक्षण देण्यात येणार आहे; मात्र कराटे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था निश्‍चित न झाल्याने अद्याप मुलांना हे प्रशिक्षण मिळत नाही. याबाबत सभेत चर्चा करताना आता परीक्षांचा कालावधी सुरु होणार त्यामुळे हे प्रशिक्षण लवकरात लवकर द्या किंवा परीक्षा संपल्यावर प्रशिक्षण देण्यात यावे, अशी सुचना सदस्य संपदा देसाई यांनी केली. घरघंटीचे 139, विशेष घटक योजना घरघंटी पुरविणे 13, शिलाई मशीन 160, सायकल 94, एमएससीआयटी 228 प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. 

मुख्यसेविकांच्या पद भरतीला स्थगिती 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 10 मुख्यसेविकांची पदे अंगणवाडी सेविकांमधुन भरण्यात येणार होती. ही भरती पूर्णतः परीक्षा घेवून भरावीत की परीक्षा आणि तोंडी परीक्षा अशा प्रकारात घ्यावी याबाबत कोणत्याही सुचना नाहीत. यावर मार्गदर्शन मागविण्यात आले आहे; मात्र ते अद्यापही प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे या भरतीला जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिली असल्याची माहिती पाटील यांनी दिली. 

वजन काट्यांचे 8 लाख अन्य योजनांवर वर्ग 

अंगणवाडीना वजन काटे देण्यासाठी या विभागाने 8 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती; मात्र जिल्ह्यातील अंगणवाड्यांना आयुक्त कार्यालयाकडून वजन काटे पुरविण्यात आले असल्याने हा 8 लाखांचा निधी अन्य योजनवर वर्ग करण्याचा ठराव सभेत घेण्यात आला. हा निधी घरघंटी आणि शिलाई मशीनवर खर्च करण्यात यावा, अशी मागणी सदस्यांनी केली. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT