Break To Tourism Development Of Are Ware Beach Ratnagiri Marathi News 
कोकण

आरे - वारे किनाऱ्याचा पर्यटन विकास अडकला कशात ?

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - कोकणातील किनाऱ्यांकडील पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे; मात्र सीआरझेडच्या बंधनामुळे पर्यटकांना पुरक व्यवस्था करून देता येत नाही. गणपतीपुळे मार्गावरील पर्यटनासाठी हॉट पॉइंट बनलेल्या आरे - वारे किनाऱ्यावर पर्यटन सुविधा देण्यासाठी एक कोटी रुपये कोकण ग्रामीण पर्यटनमधून मंजूर आहेत. तो निधी सीआरझेडच्या परवानगीत अडकला असून पर्यटन विकासाला खीळ बसत आहे. 

गोव्याप्रमाणेच कोकणातील समुद्रकिनाऱ्यांकडे पर्यटकांचा ओघ वाढत आहे. एकीकडे डोंगर दुसरीकडे अथांग, स्वच्छ आणि सुंदर असा समुद्रकिनारा अशी स्थिती आरे-वारे येथे पाहायला मिळते. गणपतीपुळेकडे जाणारा पर्यटक आरे किनाऱ्यावर थांबूनच पुढे जातो. सध्या सांगली, पुणे, मुंबई येथून अनेक पर्यटकांकडून आरे किनाऱ्यावर राहण्यासाठी चाचपणी केली जाते.

खाडी किनारी भरतीवेळी बोटींग सुरू केले असून त्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक थांबतात. याठिकाणी दाट सुरुचे बनही विकसित केलेले आहे. पर्यटनासाठी नैसर्गिक स्थिती पोषक असतानाही मात्र पर्यटकांना राहण्यासाठी सुविधाच नाहीत. त्यासाठी जिल्हा परिषद ग्रामविकास विभागाकडून कोकण ग्रामीण पर्यटन योजनेंतर्गत एक कोटी रुपयांचा आराखडा बनवला होता. त्यात आठ खोल्या, एमपी थिएटर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पार्किंग व्यवस्था यासह किनाऱ्यावर फिरायला येणाऱ्यांसाठी अन्य सुविधा दिल्या जाणार होत्या.

किनाऱ्यावर बांधकामासाठी सीआरझेडची परवानगी न मिळाल्यामुळे या सुविधांची उभारणीच करता आलेली नाही. एकीकडे खासगी हॉटेल्सची साखळी या भागात उभारली जात असताना शासकीय जागा उपलब्ध असून तिथे पर्यटकांना सुविधा देता येत नाहीत. दाट सुरुबनामधील मोकळ्या जागे बांधकाम केले जाणार होते. पण त्याला परवानगीच नसल्याने ग्रामीण पर्यटनचा एक कोटीचा निधी पडून राहीला आहे. रत्नागिरीत पर्यटक स्थिरावत नाहीत, एक दिवसात पुढे निघून जातात. एक दिवस पर्यटक राहिला तर संबंधित व्यावसायिकाला किमान दोन हजार रुपये मिळतात. पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी आरे-वारे सारख्या हॉट पॉईटवर सुविधांची गरज आहे. 

बांधकामास परवानगी नाही

कोकण ग्रामीण पर्यटन विकास योजनेंतर्गत एक कोटी रुपये आरे - वारे किनाऱ्यावर सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ठेवले आहेत. सीआरझेड नियमामुळे तेथे बांधकाम करता येत नाही. 
- मनीषा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी 

टेहळणी मनोरा अडकला 

आरे किनाऱ्यावर जीवरक्षक नेमण्यात आले असून टेहळण्यासाठी मनोरा उभारण्यात आला होता. त्यालाही पर्यावरण विभागाकडून परवानगी मिळालेली नाही. बहुतांश किनारी भागात मनोरे उभारलेले आहे. आरेत अनेक पर्यटक बुडाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यादृष्टीने ही गोष्ट अत्यावश्‍य मानली जात आहे. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arunachal Pradesh Fake News: 'काँग्रेसने देशाची अन् लष्कराची माफी मागावी!' का संतापले मंत्री किरेन रिजिजू?

Ayush Badoni double century: १९ चौकार, ३ षटकार! LSG च्या फलंदाजाचे सलग दुसरे द्विशतक... थेट वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी

Hasan Mushrif Zilla Parishad : हसन मुश्रीफ गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा कांबळेंना उच्च न्यायालयाचा दिलासा; सदस्यत्व अपात्रतेवर महत्त्वपूर्ण निकाल

अवघ्या २ वर्षांच्या चिमुकलीची तबल्यावर कमाल! १२ ताल वाजवून आणि म्हणून केला विक्रम; पाहा Video

Latest Marathi News Live Update : अमरावती शिक्षक मतदारसंघात शिंदेसेनेचे किरण सरनाईक आघाडीवर

SCROLL FOR NEXT