businessman people compulsory antigen test in ratnagiri with the help of mobile van 
कोकण

....अन्यथा तुमचा व्यवसाय होईल बंद ; का ते वाचा

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी थेट व्यापाऱ्यांच्या दारात कोरोनासाठी अँटिजेन टेस्ट केली जात आहे. त्यास व्यापाऱ्यांकडून अजूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. शहरातील अनेक बडे व्यापारी, दुकानदार आणि त्यांच्या दुकानातील कामगार हे तपासणी व्हॅनकडे फिरकलेले नाहीत. ज्यांनी चाचणी केली आहे, त्यानांच व्यवसायाची परवानगी द्या, असा सूर सोशल मीडियावर उमटू लागला आहे.

गेल्या ४ दिवसांपासून शहरात कोरोनासाठी व्यापारी, दुकानदार व त्यांच्या कामगारांची व्यापाऱ्यांच्या दारात जाऊन अँटिजेन टेस्ट केली जात आहे. काही दुकानदार, व्यापारी, विक्रेते त्वरित तपासणीला पुढे येतात तर काहीजण मोबाईल व्हॅन व अधिकारी येत असल्याचे समजताच दुकान बंद करून निघून जातात. अनेक व्यापाऱ्यांनी खबरदारी बाळगलेली नाही. मास्कचा वापर न करताच विक्रेते बिनधास्त व्यवसाय करीत असल्याने लोक संतापही व्यक्त करीत आहेत.

ज्या दुकानात खरेदीसाठी ग्राहकांची नेहमी गर्दी होते, त्यांच्याकडे कामगारांची संख्याही अधिक आहे. अशा काही दुकानदारांच्या मालकांनीही अद्याप चाचणी केलेली नाही. ज्या दुकानात कामगार, मालक बाधित निघाले, तेथील दुकाने बंद ठेवलेली नाहीत. त्यांचे सुरळीत व्यवसाय सुरू आहेत. एखादा व्यापारी दुकानदार बाधित आढळला तरी त्यांचे दुकान सील केले जात नाही अथवा त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केले जात नाही. बाधित आढळल्यास व्यवसाय बंद राहील, ग्राहक खरेदीसाठी येणार नाहीत. या भीतीपोटीच व्यापारी, दुकानदार त्वरित तपासणीला पुढे येत नाहीत.

"व्यापारी, दुकानदार व त्यांच्या कामगारांसाठी प्रशासनाने अँटिजेन तपासणीची सुविधा केली आहे. या तपासणीची भीती बाळगू नये. सहकार्य करावे."

- डॉ. ज्योती यादव, तालुका आरोग्य अधिकारी

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सामान्यांना दिलासा! पेट्रोल पंपावरून मिळणार रॉकेल; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवीन योजना आणि किंमत...

BCCI जसप्रीत बुमराहला २ कोटींची नुकसान भरपाई देणार; त्यांच्या एका निर्णयाने झालाय घोळ, करायला गेले एक अन् घडलं भलतंच...

Latest Marathi News Live Update : बालेवाडीत ढगांची गर्दी; रिमझिम पावसाची सुरुवात

Yeola Traffic Rule : येवलेकरांना मोठा दिलासा! २४ मार्चपासून मनमाड-मालेगाव मार्गावर दिवसा अवजड वाहतुकीला बंदी

राहुल मोदीशी लग्न करणार श्रद्धा कपूर? मावशी तेजस्विनी कोल्हापुरेने दिली पहिली प्रतिक्रिया, हसल्या आणि म्हणाल्या-

SCROLL FOR NEXT