Cannabis is being sold openly in Chiplun city and rural areas 
कोकण

चिपळूणात गांजा विक्री तेजीत ; तरूणाई नशेच्या विळख्यात

मुझफ्फर खान

चिपळूण - चिपळूण तालुक्यात गांजा आणि अमली पदार्थांची खुलेआम विक्री सुरू आहे. या नशाबाजीच्या विळख्यात तरूण पिढी सापडून अनेक किशोरवयीन मुले आणि तरुण बरबाद झाले आहेत. अनेकजण त्याच मार्गावर आहेत. गांजी विक्रीवर कारवाई कारवाई व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्ठमंडळ आज पोलिस ठाण्यावर धडकले.

चिपळूण शहर आणि ग्रामीण भागात खुलेआम गांजा विकला जात आहे. त्यावर कोणाचेही अंकुश नाही. काही दिवसापूर्वी सावर्डे येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एका घरावर धाड टाकून 90 हजार रुपयाचा गांजा जप्त केला होता. ग्रामीण भागातील तरूण गांजा घेण्यासाठी शहरात येतात. कोपर्‍या-कोपर्‍यांत चौकशी करून नशेची ’वस्तू’ शोधून काढतात. याबाबत काही ग्रामस्थांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र प्रकारांची तक्रार करणार्‍या नागरिकांना मात्र ’नेमकी ठिकाणे दाखवा, कारवाई करू’, असे घोटीव उत्तर पोलिस अधिकार्‍यांकडून ऐकायला मिळाले. त्यानंतर काहींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शौकत मुकादम यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर मुकादम हे राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ घेवून आज पोलिस ठाण्यावर धडकले. तालुक्यात सुरू असलेल्या अवैध गांजा विक्रीवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे. यावेळी राष्ट्रवादी कांँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, शहरप्रमुख मिलिंद कापडी, क्षेत्रप्रमुख एकनाथ साळवी, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सनी आरेकर आदी उपस्थित होते.


तस्करीचे रॅकेट

काही स्थानिकांच्या मदतीने गांजाची तस्करी होते. पुढे दलालांमार्फत गावातील ठराविक ठिकाणी त्याची विक्री केली जात असल्याचे समजते. जोमात चालणार्‍या गांजा आणि अमली पदार्थांच्या विक्रीने तरुणाई मात्र विळख्यात सापडत आहे. पोलिसांनी कारवाई केली नाही तर राष्ट्रवादीतर्फे आंदोलन छेडले जाईल. 

-शौकत मुकादम, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेल 
 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT