case in dabhol kokan marathi news 
कोकण

मला अस्वस्थ होतय डॉक्टरांकडे जायच आहे म्हणत केली विनवणी अन्....

सकाळ वृत्तसेवा

दापोली (रत्नागिरी) : तीन महिन्यांपूर्वी अँजिओप्लास्टी केलेल्या दापोली तालुक्यातील लाडघर येथील एका व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागल्याने ते त्यांच्या मुलासह दापोलीतील डॉक्टरांकडे रिक्षा घेऊन जात असताना  केळसकर नाका येथे उभे असलेले  दापोलीचे तहसीलदार समीर घारे यांनी पोलिसांना त्यांची रिक्षा जप्त करण्यास सांगितली त्यामुळे  या 58 वर्षीय व्यक्तीला उपचारासाठी जाता आले नाही व  दापोलीपासून ७ किलोमीटर वर असलेल्या आपल्या घरी मुलासह चालत जावे लागले.


याबाबत लाडघर येथील प्रकाश चांदोरकर यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की आपली 3 महिन्यांपूर्वी अँजिओप्लास्टी झाली होती. ता.21 रोजी सायंकाळी 7.30 वाजणेपूर्वी आपल्याला  अस्वस्थ वाटू लागल्याने  डॉक्टरांकडे तपासणी करण्यासाठी आपण मुलासह दापोलीत रिक्षाने येत होतो .मुलगा रिक्षा चालवत होता.  दापोली शहरातील केळसकर नाका येथे त्यांची  रिक्षा दापोली पोलिसांनी अडवली तेथे दापोलीचे तहसीलदार व पोलीस उभे होते.  तहसीलदार घारे यांचे आदेशानुसार पोलिसांनी रिक्षा जप्त करण्याची कारवाई सुरू केली तेव्हा चांदोरकर यांनी आपण हार्ट पेशंट असून अस्वस्थ वाटत असल्याने  डॉक्टरांकडे उपचारासाठी जात असल्याचे सांगत उपचाराची फाईलही दाखवण्याचा प्रयत्न केला.

मात्र  दापोलीचे  तहसीलदार यांनी काहीही ऐकून घेण्यास नकार दिला तर पोलिसांनी आपण हुकुमाचे ताबेदार असल्याचे सांगत 
 चांदोरकर घेऊन आलेली रिक्षा दापोली पोलिसांनी जप्त केली.  त्यामुळे चांदोरकर याना उपचारासाठी डॉक्टरांकडे जाता आले नाही व गावाकडे जाण्यासाठी दुसरे वाहन न  मिळाल्याने  ते व त्यांचा मुलगा लाडघर येथे आपल्या गावी चालत जाण्यास निघाले. आधीच त्रास होत असल्याने चांदोरकर हे दम लागल्यावर रस्त्यावर बसत, थोडी विश्रांती घेत मजल दरमजल करत त्यांना ७ किलोमीटर अंतर पार करण्यास रात्रीचा 1 वाजला, त्यांच्यासोबत असलेला मुलगा रडकुंडीस आला होता.


दापोलीतील प्रशासनाच्या या  असहिष्णुतेबद्दल चांदोरकर यांनी नाराजी व्यक्त केली  आहे.यासंदर्भात वाहतूक विभागाचे कर्मचारी शिंदे यांचेकडे चौकशी केली असता तहसीलदार दापोली यांचे आदेशानुसार आपण सदर रिक्षावर  कारवाई केल्याचे सांगितले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT