cashew and mango farm fire and rupees 45 lakh damages in ratnagiri 
कोकण

वणव्याच्या भडक्‍यात २५ एकरातील काजू, आंब्याची कलमे जळून खाक ; ४५ लाखांचे नुकसान

राजेश शेळके

रत्नागिरी : तालुक्‍यातील शीळ-सड्यावर वणव्याच्या भडक्‍यात २५ एकर परिसरातील सुमारे १ हजार १२५ आंबा, काजूची कलमे खाक झाली. यामध्ये चार बागायतदारांचे सुमारे ४५ लाखांचे नुकसान झाले आहे. स्थानिकांच्या प्रयत्नाने काही तासांत ही आग आटोक्‍यात आणली. ३३ केव्ही मुख्य विद्युत वाहिनीमध्ये शॉर्टसर्किंट होऊन ही आग लागल्याचा अंदाज आहे. 

काल दुपारी अचानक वणवा पेटला आणि काही क्षणात या वणव्याने रौद्ररूप धारण केले. सुमारे २५ एकर परिसरात हा वणवा पसरला आणि त्यात आंबा-काजूची झाडे भस्मसात झाली. ही आग या परिसरातून जाणाऱ्या विद्युत वाहिनीवर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे बोलले जात आहे. स्थानिकांच्या मदतीने आग आटोक्‍यात आली. राजेश तिवारी यांच्या बागेतून महावितरणची ३३ केव्हीची उच्च दाब वाहिनी गेली आहे. त्यातील तीन खांब यांच्या बागेत असून, त्यावर शॉर्टसर्किट होऊन ठिणगी पडून आग लागल्याचा अंदाज आहे. तसे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.

दरम्‍यान, महसूल विभागाकडून या बागांचे पंचनामे झाले असून, त्यामध्ये नुकसानीची नोंद करण्यात आली. प्रशासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी बागायतदारांनी केली आहे. मिरजोळे सरपंच संदीप नाचणकर यांनी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानाची पाहणी केली आहे. नुकसानीबाबत तातडीने तहसीलदार शशिकांत जाधव यांच्या प्रयत्नाने पंचनामे झाले.

यांचे झाले नुकसान

  • राजेश तिवारी यांची ५५० आंबा कलमांचे सुमारे ३० लाखांचे 
  •  विजय करंदीकर यांचे २०० कलमांचे २० हजारांचे
  • सुविधा मांडवकर आणि कामेरकर यांची काजूची ३०, तर आंब्याच्या ५५ कलमांचे २ लाखांचे 
  • दत्ताराम देसाई यांची काजूची २७० कलमांचे १२ लाखांचे 
  • एकूण १ हजार १२५ कलमे खाक

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी भारतात आला होता कसाब? उज्ज्वल निकमांचा धक्कादायक दावा, म्हणाले...

Pune DJ Noise : पुण्यात डीजेपुढे पोलिस हतबल!, पोलिसांसमोरच डीजेचा दणदणाट अन् दादागिरीची भाषा; ‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’

विद्यार्थिनीवर कथित अत्याचाराचा मेसेज व्हायरल; विद्यार्थ्यांनी विद्यापीठात केली तोडफोड, राष्ट्रीय महामार्गही रोखून धरला

IND vs WI, 1st ODI Weather : पहिल्या सामन्यात पावसाचा अडथळा येणार? तिरुअनंतपुरममध्ये कसे आहेत हवामान अंदाज, घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : ही लोकशाहीची हत्या : संजय राऊत

SCROLL FOR NEXT