Cattle Sakal
कोकण

गुरे चोरट्यांचा धुमाकूळ, 8 गुरे चोरली; अनेक गुरे बेशुद्धावस्थेत सापडली

सुधागड तालुक्यात सध्या गुरे चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शुक्रवारी (ता.3) तालुक्यातील कसईशेत गावातील 8 गुरे चोरीला गेली असून अनेक गुरे बेशुद्धावस्थेत पडली होती.

अमित गवळे

पाली - सुधागड तालुक्यात सध्या गुरे चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शुक्रवारी (ता.3) तालुक्यातील कसईशेत गावातील 8 गुरे चोरीला गेली असून अनेक गुरे बेशुद्धावस्थेत पडली होती. याबाबत शेतकरी परशुराम निरगुडा व इतर ग्रामस्थांनी जांभूळपाडा पोलीस दुरक्षेत्र येथे तक्रार दाखल केली आहे.

सुधागड तालुक्यातील परळी व जांभुळपाडा विभागात गुरांना गुंगीचे इंजेक्शन देऊन बेशुध्द करून चोरून नेणारी टोळी सध्या कार्यरत झाली आहे. शेतकरी परशुराम निरगुडा यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या मालकीच्या वाड्याच्या रिकाम्या मोकळ्या जागेत त्यांची व गावाच्या इतर शेतकऱ्यांची गुरे विश्रांतीला बसतात. मात्र शुक्रवारी (ता.3) पहाटेच्या सुमारास गुरांचा आरडाओरडा झाल्याने शेतकरी गुरांच्या ठिकाणी धावले, मात्र गुरे बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले. तर काही गुरे बेशुद्धावस्थेत आढळली होती.

यामध्ये परशुराम निरगुडा, लिंबाजी निरगुडा व नारायण वाघमारे यांची प्रत्येकी दोन गुरे आणि झिमा ठोंबरे व वामन वाघमारे यांची प्रत्येकी एक-एक गुरे चोरीला गेली आहेत. या सर्व गुरांची एकूण किंमत तब्बल 88 हजार इतकी आहे.

पोलीस स्थानकात तक्रार देतेवेळी परशुराम निरगुडा, भिवा शिद, गोमा ठोंबरे, उपसरपंच पंकज पाठारे, सदस्य रमेश वाघमारे, माजी उपसरपंच रमेश पाठारे, जगन्नाथ पाठारे, रविंद्र चौधरी, नारायण वाघमारे, पदू वाघमारे, सोमा शिद आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांची गुरे चोरीला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्यानुसार संशयित व अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुरे चोरीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने नाकाबंदी सह आवश्यक ती उपाययोजना करण्यावर भर दिला आहे. मध्यरात्री महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे. तसेच ग्रामीण भागात पोलीस व्हॅन गस्त घालणार आहे. मध्यरात्री येणारी संशयास्पद वाहने तपासली जातील, बाहेरच्या वाहनांवर करडी नजर ठेवली जाईल. तसेच काही ग्रामपंचायतींना महत्वाच्या व मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन पोलीस प्रशासनामार्फत केले आहे.

- विजय तायडे, पोलीस निरीक्षक पाली सुधागड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

SCROLL FOR NEXT