Chakarmani turned to agriculture in khed ratnagiri 
कोकण

की बोर्डवर सराईतपणे फिरणाऱ्या बोटांमध्ये आला बैलाचा कासरा अन् ते वळले शेतीकडे.....

सकाऴ वृत्तसेवा

खेड (रत्नागिरी) : मुंबई, पुणे यासारख्या औद्योगिक शहरांमध्ये काम करणारे अनेक हात कोरोनामुळे पुन्हा एकदा शेतात नांगर हाकताना दिसू लागले आहेत. त्यामुळे  गेली काही वर्षे संगणकांच्या की बोर्डवर सराईतपणे  फिरणाऱ्या बोटांमध्ये आता नांगराला जुपलेल्या बैलाचा कासरा आला असल्याचे चित्र सध्या कोकणामध्ये पहावयास मिळत आहे. 


मुंबई, पुणे या मोठ्या लोकवस्तीच्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर मुंबईतील चाकरमान्यांनी मुंबई सोडून गाव गाठण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला शहराबाहेर जाण्यास परवानगी नसल्याने गांव गाठण्याच्या प्रयत्नात असलेल्या चाकरमान्यांची गैरसोय मात्र पुढे शासनाकडून परवानगी मिळताच हजारोच्या संख्यने चाकरमानी आपापल्या गावी परतले.

कोरोनामुळे गावी परतलेल्या बहुतांशी चाकरमान्यांनी परिस्थिती बदलली की पुन्हा नोकरीचे शहर गाठण्याचा विचार केला होता. मात्र आता मुंबई पुण्याकडची परिस्थिती बदलण्याची आशा मावळली असल्याने कोरोनामुळे गावात परतलेले चाकरमानी पुन्हा आपला पारंपारिक व्यवसाय असलेल्या शेतीकडे वळले आहेत.कोकणात पावसाने आगमन झाल्यावर शेतीच्या कामाने वेग घेतला आहे. कोरोनाची दहशत असतानाही मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांनी पेरणी उरकली होती. पाऊस सुरु होताच शेतात वाफे तयार झाले असून आता कधीही लावणीला सुरवात होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर लावणीपुर्व शेतीची मशागत म्हणजे शेतात नांगरटीला सुरवात झाली आहे. या वर्षी प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरात एक चाकरमानी आलेला असल्याने नांगर हाकण्याचे  काम चाकरमानी करू लागले आहेत. त्यामुळे मुंबई पुणे येथील वातानुकूलित कार्यालयातील संगणकावर सफाईने चालणाऱ्या बोटांमध्ये आता बैलाचा कासारा आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's World Cup: पाकिस्तानची जर्सी घालून भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी फुल सपोर्ट; चाहत्याचा Video Viral

Mumbai Airport: महत्त्वाची बातमी! मुंबई विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या बंद राहणार; का अन् कधी? जाणून घ्या...

Latest Marathi News Live Update : मंडणगड साईनगर येथे ‘नाना - नानी पार्क’चे लोकार्पण

Vote Theft: दुबार मतदान झालंय हे भाजपाने अखेर मान्य केले? आशिष शेलारांच्या 'त्या' वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Male Breast Cancer : महिलांप्रमाणे पुरुषांनाही होऊ शकतो ‘स्तनाचा कर्करोग’ ; जाणून घ्या, नेमकी लक्षणे काय?

SCROLL FOR NEXT