check how black rice production increases the economy of farming in sindhudurg its help as a medical
check how black rice production increases the economy of farming in sindhudurg its help as a medical 
कोकण

काळा तांदुळ फुलवणार पैशांचा मळा

राजेश सरकारे

कणकवली : अनेकविध औषधी गुणधर्म असलेल्या काळ्याकुट्ट तांदळाची लागवड आता जिल्ह्यातही होऊ लागली आहे. ओरोस-रानबांबुळी येथील प्रगतीशील शेतकरी संतोष गावडे यांनी यंदा अवघ्या पाच गुंठे क्षेत्रात काळ्या तांदळाचे २०० किलो उत्पादन घेतले आहे. पुढील वर्षी हे भात बियाणे सिंधुदुर्गातील इतर प्रगतीशील शेतकऱ्यांनाही दिले जाणार आहे.

५०० ते ६०० रुपये किलो दर असणारा हा तांदूळ भविष्यात जिल्ह्यातील  उन्नतीत महत्त्‍वाचा हातभार लावणार आहे. छत्तीसगड, नागालॅंड, मणीपूर या भागात ‘चेका-हाओ’ या काळ्या तांदळाच्या बियाण्याची लागवड तेथील शेतकरी करतात. प्रामुख्याने औषधी कंपन्या हा तांदूळ तेथील शेतकऱ्यांकडून खरेदी करतात.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बाजारात या तांदळाचा दर ५०० ते ६०० रूपये किलो आहे. हा तांदूळ सिंधुदुर्गातही उत्पादित झाला तर इथल्या शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल. हा ध्यास घेऊन रानबांबुळीतील प्रगतीशील शेतकरी गावडे यांनी काळ्या तांदळाच्या बियाण्याचा शोध सुरू केला. किर्लोस येथील कृषि विज्ञान केंद्राने यंदाच्या पावसाळ्यापूर्वी काळ्या तांदळाचे बियाणे गावडे यांना उपलब्ध करून दिले. मणिपूर येथून आणलेल्या ‘चेका-हाओ’ या ब्लॅक राइस बियाणाची लागवड गावडे यांनी ‘गावठी भात बियाण्यांचे संवर्धन’ या उपक्रमांतर्गत शेतामधील पाच गुंठे क्षेत्रात केली.

भात पेरणीनंतर ११० दिवसांत हे भात तयार झाले. यात सुदैवाची बाब म्हणजे परतीचा पाऊस कोसळण्याआधीच या भाताची कापणीही पूर्ण झाली होती. त्यामुळे या भाताचे नुकसान देखील टळले. पाच गुंठे क्षेत्रातून तब्बल दोनशे किलो काळ्या तांदळाचे उत्पादन गावडे यांना मिळाले आहे. आता हे २०० किलो बियाणे पुढील वर्षी जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांना दिले जाणार असल्याची माहिती शेतकरी श्री. गावडे यांनी दिली.

काय आहे काळा तांदूळ

हा तांदूळ सर्वसाधारण तांदळासारखा असला तरी रंगाने काळा आहे. या तांदळाचे उत्पादन पूर्वी चीनमध्ये केवळ राजपरिवाराच्या वापरासाठी होत असे. सर्वसामान्यांना मज्जाव असल्याने ‘फॉरबिडन राइस’ अशीही त्याची पाश्‍चात्त्य देशात ओळख आहे. कालांतराने तो अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोपमध्ये व नंतर उत्तर-पूर्व भारतात आला.


गावठी वाणांचेही संवर्धन

प्रगतीशील शेतकरी श्री. गावडे हे पारंपरिक गावठी भात बियाण्यांच्या संवर्धनाचीही मेहनत घेत आहेत. कीड रोग, अतिपाऊस किंवा कमी पावसातही चांगले उत्पादन देणाऱ्या कोथिंबीर, खारा मुणगा, घाटी, पंकज, वालय, बेळा या भाताच्या जातींचीही लागवड यंदा श्री. गावडे यांनी केली आहे.

"जिल्ह्यात प्रथमच संतोष गावडे यांनी काळ्या तांदळाची लागवड केली. पुढील वर्षीपासून जिल्ह्यातील इतर प्रगतीशील शेतकरी तसेच महिला बचतगटाच्या माध्यमातून या तांदळाचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या बियाण्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात नवी क्रांती होईल."

- धनंजय गावडे, कृषि सहाय्यक

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुरात शतकाच्या उंबरठ्यावर, सीएसके गाठणार का 200 चा टप्पा

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT