chief minister uddhav thackeray speech issues konkan sindhudurg
chief minister uddhav thackeray speech issues konkan sindhudurg 
कोकण

कोकणवासीयांना सामर्थ्यवान बनवणार ः ठाकरे

प्रशांत हिंदळेकर

मालवण (सिंधुदुर्ग) - माझा कोकण समृद्ध झालाच पाहिजे. कोकणाचे हे करीन, मी ते करीन, अशा पोकळ घोषणा मी करणार नाही; मात्र कोकणातील सर्वसामान्यांना सामर्थ्यवान बनविण्यासाठी जे जे करायची गरज असेल ते ते करीन, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली. तालुक्‍यातील मसुरे-आंगणेवाडी लघू पाटबंधारे योजना तसेच मालोंड- मालडी कोल्हापूर पाटबंधारे योजनेचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले, यावेळी ते बोलत होते. 

ते म्हणाले, ""तुम्ही लोक मागणी करता ती स्वतःसाठी नाही. मला स्वतःला वैद्यकीय महाविद्यालय पाहिजे, हॉस्पिटल पाहिजे असे मागत नाहीत. सत्ताधारी म्हणजे आम्ही विश्‍वस्त, जनतेचे सेवेकरी आहोत. या सत्तेचा स्वतःसाठी दुरुपयोग न करता जे तुम्ही वैद्यकीय महाविद्यालय मागितले ते शासकीय आहे. सर्व काही माझे आहे. सर्व मलाच पाहिजे, असे नाही. कोकण तर माझेच आहे. या कोकणातील माझा बांधव, भगिनी कशा शक्तिमान होतील, हा या सत्तेचा आणि भराडी मातेचा आशीर्वादाचा खरा अर्थ आहे. स्वतःसाठी सगळे मागायचे, स्वतःसाठी सगळे करायचे, यापेक्षा वेगळ्या दृष्टीने तुम्ही विचार करता, याचा मला अभिमान आहे. रत्नागिरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, ही मागणीही विचाराधीन आहे. ती पूर्णत्वाला आल्याशिवाय त्याची अधिकृत घोषणा करणार नाही.'' 

ते म्हणाले, ""कोरोना आला आणि सगळे ठप्प झाले; मात्र आता त्यांना पुन्हा सुरवात करत असून सागरी महामार्ग लवकरच सुरू होईल. चिपीचे विमानतळ पूर्ण झाले असून काही तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर ते विमानतळही सुरू होईल. तुमच्या मनातील ज्या काही योजना असतील, त्यात पर्यटन असेल, पर्यावरणपूरक उद्योगाच्या असतील, मत्स्यव्यवसायशी निगडित असतील त्यांना मंजुरी दिली जाईल. माझा कोकण समृद्ध झालाच पाहिजे. कोकणाचे हे करीन, मी ते करीन अशा पोकळ घोषणा मी करणार नाही.'' 

यावेळी पालकमंत्री उदय सामंत, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, रोहयो व जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, भास्कर आंगणे, बिळवस आंगणेवाडीचे सरपंच मानसी पालव, मालडीचे सरपंच संदीप आडवलकर, कुंभवडे सरपंच सूर्यकांत तावडे, श्री. वडाळकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी, रत्नागिरी, श्री. देवशेट्टे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, अंबडपाल व फोंडाघाट, शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पडते, संदेश पारकर, नागेंद्र परब, बबन शिंदे, हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मंदार केणी आदी उपस्थित होते. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT