Court Sakal media
कोकण

'या' तीन खात्यांविरोधात पालिका थेट कोर्टात

जनहित याचिका दाखल करण्याचा पालिकेचा ठराव

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : अतिवृष्टी व महापुराच्या धोक्याबाबत शहरातील जनतेला अनभिज्ञ ठेवले. यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात टाकला, असा ठपका येथील पालिकेने हवामान, पाटबंधारे व महसूल विभागावर ठेवला आहे. हवामान, पाटबंधारे व महसूल या तिन्ही विभागांविरोधात पालिका न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे.

न्यायालयात जाण्याचा महत्त्वपूर्ण ठराव पालिकेत काल झालेल्या सर्वसाधारण सभेत संमत झाला.

न्यायालयात जाण्याचा महत्त्वपूर्ण ठराव पालिकेत काल (ता. ५) झालेल्या सर्वसाधारण सभेत संमत झाला. शहरातील बांधकाम परवानगीबाबतीत नवीन नियमावली तयार करण्याचा धोरणात्मक निर्णयही या वेळी घेण्यात आला. गेले महिने कोरोनाच्या परिस्थितीमुळे पालिकेची सर्वसाधारण सभा झाली नव्हती. त्यातच शहरात पूर आल्याने ही सभा लांबली होती. मात्र, काल नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. या सभेत चिपळूणच्या इतिहासात प्रथमच सर्वाधिक उंची गाठलेल्या महापुराविषयी जोरदार चर्चा झाली. २२ व २३ जुलैला झालेल्या महापुरात चिपळूण बाजारपेठ व नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

चिपळूणवासीयांना हवामान खात्याने तसेच पाटबंधारे व महसूल विभागाने कोणताही धोक्याचा इशारा वेळीच न दिल्याने चिपळूणचे नुकसान झाले. शहरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला. त्याला निव्वळ हवामान खाते, पाटबंधारे व महसूल विभाग जबाबदार असल्याने त्यांच्याविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

या सभेत पूर परिस्थितीला कारणीभूत असलेल्या अन्य बाबींवर चर्चा करण्यात आली. यात बांधकाम परवानगीसाठी नवीन नियमावली तयार करण्याचे ठरले. विशेषतः यापुढे बांधकाम परवानगी देताना भराव न करता ‘स्टील पार्किंग’ची अट लागू करावी, अशी मागणी बहुतांश नगरसेवकांनी केली. तसेच, १ जुलैपासून बांधकाम परवानगीसाठी आलेले प्रस्ताव स्थगित ठेवण्यात यावेत, असेही ठरले आहे. याविषयी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही या सभेत करण्यात आल्या.

पालिका मालमत्तेसाठी १०० कोटींचा प्रस्ताव

महापुरात चिपळूण पालिकेच्या मालमत्तेलाही तडाखा बसला आहे. विविध इमारतींचे नुकसान झाले. त्याची दुरुस्ती व भरपाई करण्यासाठी शासनाकडे १०० कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. त्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव लवकरात लवकर करण्याच्या सूचना पालिकेच्या बांधकाम विभागाला करण्यात आल्या.

मृतांच्या वारसांना ५० हजार देणार

महापुरात एकूण ११ जणांचा बुडून मृत्यू झाला. यातील तीन जण तालुक्यातील पेढे, तर एकजण खेर्डी येथील आहे. त्या व्यतिरिक्त अन्य मृत शहरातील असल्याने त्यांच्या वारसदारांना पालिकेकडून प्रत्येकी ५० हजारांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती नगरसेवक विजय चितळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT