कोकण

Chiplun Flood live - पुराचे पाणी ओसारण्यास सुरुवात

धरण क्षेत्रातील पावसामुळे गुरुवारी पहाटेपासून चिपळूनमध्ये पुरजन्यस्थिती निर्माण झाली.

सकाळ डिजिटल टीम

चिपळूण : गेले 24 तासात पुराच्या पाण्यात काढल्यानंतर चिपळूणातील पाणी शुक्रवारी सकाळी ओसारण्यास सुरुवात झाली होती. (chiplun live flood) मात्र कोयनातून विसर्ग सुरू करण्यात आल्याने त्याचा पुन्हा परिणाम चिपळूणवर होतो का ते लवकरच समजणार आहे. NDRF सह नेव्ही, आर्मीची पथके 24 तासानंतर चिपळूनकडे रवाना झाली आहेत, तर गुरुवारी रात्रीपासूनच रेस्क्यू ऑपेशनला सुरुवात झाली आहे. धरण क्षेत्रातील पावसामुळे गुरुवारी पहाटेपासून (konkan rain update) चिपळूनमध्ये पुरजन्यस्थिती निर्माण झाली. कधी नव्हे तो चिपळूण, खेर्डी आणि आजूबाजूच्या परिसर पाण्याने व्यापला गेला. (chiplun live news)

परिस्थिती होणार हा अंदाज असतानाही मदत पथके खूप उशिरा चिपळूणच्या दिशेने निघाली. वाटेत अनेक नैसर्गिक अडचणी आल्या आणि NDRF 16 तासानंतर रात्री 8 च्या दरम्यान चिपळूणला पोहोचले. जितकी शक्य तितकी मदत NDRF ने केली. हेलपिंग हँड, रत्नदुर्ग मौंटेनिअर्स यांनीही रत्नागिरीतुन थेट चिपळूणला जाऊन अडचणीतील लोकांना बाहेर काढण्यास मदत केली. जयगड, दापोली, गुहागर येथून अनेक मच्छीमारी नौकांनी चिपळूनमध्ये आपल्या बोटी नेल्या.

अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी wireless मध्ये दिलेल्या माहितीनुसार, सध्या चिपळूणमध्ये 15 बोटी उपलब्ध असून त्यापैकी 8 बोटी मार्फत बचाव कार्य सुरु आहे. नेचवर्क नसल्याने फोन लागत नाहीत. Police Wireless मार्फतच संदेशवहन सुरु ठेवणेबाबत सूचीत केलेले आहे. खऱ्या अर्थाने शुक्रवारपासून मदत कार्यास वेग आला आहे. सकाळी चिपळूणातील पावसाचा जोर ओसरला होता. गोवळकोट रस्त्यावरील पुराचे पाणी साधारण 3 फुटाने कमी झाले होते. मात्र कोयनेचा विसर्ग सुरू झाला असून त्याचा परिणाम चिपळूण पूर्वस्थितीवर किती होतो हे लवकरच समजणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arif Khan Chishti : मुस्लिम तरुणाचा मोठा निर्णय! संत प्रेमानंद महाराजांना किडनी दान करण्याची तयारी, वाचा कोण आहे आरिफ खान?

Whatsapp Mirror : व्हॉट्सअ‍ॅपवर एक परमिशन अन् बँक अकाऊंट रिकामं, 'हे' फेमस फीचर ठरतंय मोबाईल हॅकिंगचं कारण

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT