Chiplun Khed MIDC initiative 1 crore 52 lakh  Deposit in CM Assistance Fund kokan marathi news
Chiplun Khed MIDC initiative 1 crore 52 lakh Deposit in CM Assistance Fund kokan marathi news 
कोकण

चिपळूण, खेड एमआयडीसीचा पुढाकार ; 1 कोटी 52 लाखाची मदत..

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : कोरोना संसर्गाविरोधात युद्ध पुकारणार्‍या राज्य सरकारच्या मदतीला चिपळूण व खेड तालुक्यातील एमआयडीसीने पुढाकार घेतला आहे. कार्यकारी अभियंता परशुराम करावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता अशोक पाटील यांनी पहिल्या टप्यात विविध उद्योजकांकडून 1 कोटी 52 लाख रुपये गोळा केले. ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात आली.

 राज्यातील करोनाचा विषाणू संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी होत असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता  निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते उघडण्यात आले आहे. या खात्यात रत्नागिरी जिल्ह्यातून मदतीचा ओघ वाढावा अशी सूचना जिल्हाधिकार्‍यांनी केली होती.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिले  1 कोटी 52 लाख

एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता श्री. करावडे यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत चिपळूणचे उपअभियंता अशोक पाटील यांना लोटे-परशुराम, खेर्डी व खडपोली एमआयडीसीतील उद्योजकांना मदत करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची सूचना केली. श्री. पाटील यांनी लोटे परशुराम, खेर्डी व खडपोलीतील कारखानदारांची प्रत्यक्ष भेट घेवून तर काहींशी फोनवर चर्चा करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत करण्याची विनंती केली. त्यानूसार पहिल्या टप्यात 1 कोटी 52 लाखाचा निधी जमा झाला आहे. 

मदत करणार्‍या कंपन्या

सुप्रिया लाईफसायन्स - 35 लाख, घरडा केमिकल्स - 25 लाख, विनंती ओरगॅनिक - 25 लाख, डाऊ केमिकल्स - 25 लाख, स्पार्क अग्रो -11 लाख, पुष्कर केमिकल्स 7 लाख 50 हजार, श्रेयस 7 लाख 50 हजार, एमको पेस्टिसाईड 7 लाख 50 हजार, साफयिस्ट 5 लाख, सीईटीपी लोटे 3 लाख 50 हजार
    

राज्यात ज्यावेळी मोठी नैसर्गिक आपत्ती आली त्या काळात चिपळूण व खेड तालुक्यातील उद्योजकांनी सढळ हस्ते सरकारला मदत केली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मदतीचा ओघ सुरू आहे. उर्वरित कारखानदारांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत करावी यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. 

परशुराम करवडे,कार्यकारी अभियंता एमआयडीसी रत्नागिरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT