Uddhav Thackeray VS Eknath Shinde esakal
कोकण

Chiplun : 'मी उद्धव ठाकरेंसोबतच, पक्षाशी गद्दारी करणं आमच्या रक्तात नाही'; सामंतांच्या भेटीनंतर कदमांचं स्पष्टीकरण

पालकमंत्री तसेच किरण सामंत यांची भेट घेण्यामागे राजकीय हेतू नव्हता.

सकाळ डिजिटल टीम

जिल्हाप्रमुख सचिन कदम हेही शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगू लागली.

चिपळूण : गेली अनेक वर्षे कबड्डी क्षेत्रात कार्यरत असून, आपल्या जिल्ह्यात एकदा तरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा व्हावी हे सर्व कबड्डीप्रेमींचे स्वप्न आहे. या वेळी ही संधी महाराष्ट्राला मिळणार असल्याने रत्नागिरी जिल्ह्यात ही स्पर्धा घ्यावी या विषयीच्या चर्चेसाठी पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) व उद्योजक किरण सामंत यांची भेट घेतली. त्यामध्ये कोणताही राजकीय हेतू नव्हता, असे स्पष्टीकरण सचिन कदम (Sachin Kadam) यांनी दिले.

मी उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षासोबतच असून पक्षाशी गद्दारी ही आमच्या रक्तात नाही, अशी स्पष्ट भूमिकाही जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी मंगळवारी स्पष्ट केली. गेल्या दोन दिवसापांसून पालकमंत्री उदय सामंत व उद्योजक किरण सामंत यांची जिल्हाप्रमुख कदम यांच्या भेटीविषयाची चर्चा सोशल मीडियावर जोरदारपणे सुरू आहे.

जिल्हाप्रमुख सचिन कदम हेही शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगू लागली. त्यातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर कदम यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, पालकमंत्री तसेच किरण सामंत यांची भेट घेण्यामागे राजकीय हेतू नव्हता. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यात झालेली नाही.

'राष्ट्रीय स्पर्धेत प्रत्येक राज्यातील संघ, व्यावसायिक संघ व नामांकित खेळाडू भारतीय संघात निवड होण्यासाठी ताकदीने खेळत असतात. तो खेळ जिल्हाभरातील क्रीडारसिकांना अनुभवता यावा. जिल्ह्याला एकदातरी संधी मिळायला हवी, या उद्देशाने प्रयत्न केले जात आहेत. आपण जिल्हा कबड्डी असोसिएशन अध्यक्ष या नात्याने सामंत यांची भेट घेतली. लवकरच कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेण्याचे नियोजन आहे.'

सध्या शिंदे गटात फुगीर भरती सुरू असून काहींना नाइलाजास्तव प्रवेश करावा लागत असला तरी ते पुन्हा शिवसेनेत सामावतील. यामध्ये शिवसेनेचा खरा मतदार पक्षापासून बाजूला गेलेला नाही. त्या उलट मुस्लिम समाजबांधवांमधून पक्षाला मोठी साथ मिळत असल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले.

तालुकाप्रमुख विनोद झगडे यांनी देखील आम्ही सर्व एकसंघ असून होऊ दे चर्चा, या उपक्रमांतर्गत पक्षाची नाळ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले. या वेळी विधानसभा क्षेत्राध्यक्ष बाळा कदम, शहरप्रमुख शशिकांत मोदी, राकेश शिंदे उपस्थित होते.

चिपळूण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, त्याची मुहूर्तमेढ शहरातील वडनाका येथे लावली गेली. आजही आम्ही त्याच भागात कार्यरत असून शिवसेनेपासून आम्ही कधीही अलिप्त होऊ शकत नाही.

-सचिन कदम, जिल्हाप्रमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Development : पुण्याच्या प्रश्नांचा विधानसभेत आवाज, आमदारांकडून उपाययोजनांची मागणी; वाहतूक कोंडीसह अतिक्रमणे हटवावीत

Ashadhi Wari 2025: 'जो तरुण भाग्यवंत, नटे हरी कीर्तनात'; आधुनिक वाद्यांसह भारुडकार कृष्णा महाराज यांची भारुडसेवा

Gadchiroli Education: गडचिरोलीचे शिक्षणाधिकारी पोलिसांना शरण; बोगस शिक्षक पराग पुडकेचा प्रस्ताव केला होता मंजूर

ख्रिश्चन आक्रमक! आमदार पडळकरांचे ख्रिश्चन धर्माबद्दल अवमानकारक वक्तव्य; मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा

Pune News : आपत्तींमुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ; लष्करी अभियंत्यांच्या कामगिरीचेही कौतुक

SCROLL FOR NEXT