अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांनी जवळपास नऊ हजार मतांची आघाडी घेतली आहे. या आघाडीसह त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. रायगडमध्ये तटकरे यांना शिवसेनेच्या अनंत गीते यांनी अत्यंत चुरशीची लढत दिली.
आतापर्यंत तटकरे यांना 3,98,475 मतं तर गीतेंना 3,89,535 मतं मिळाली आहेत. याच आकडेवारीसह तटकरेंचा विजय जवळपास निश्चित झाला आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. मतमोजणीला सुरवात झाल्यावर आधी सुनील तटकरे आघाडीवर होते मात्र, आता शिवसेनेचे अनंत गीतेंनी हजार मतांची आघाडी घेतली आहे. या मतदारसंघात 16 उमेदवार रिंगणात असले, तरी प्रमुख लढत राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे विरुद्ध शिवसेनेचे अनंत गीते यांच्यात होणार आहे.
23 एप्रिलला झालेल्या निवडणुकीवेळी मतदारसंघातील 10 लाख 20 हजार 140 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आपलाच उमेदवार जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त करत आहेत. परंतु, 23 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या दिवशी रायगडचा खासदार कोण होणार आहे? हे स्पष्ट होणार आहे.
अनंत गीते (शिवसेना), सुनील तटकरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस), नथुराम हाते (बहुजन मुक्ती पार्टी), सुमन कोळी (वंचित बहुजन आघाडी), मिलिंद साळवी (बहुजन समाज पार्टी), संदीप पार्टे (बहुजन महापार्टी), गजेंद्र तुरबाडकर (क्रांतिकारी जयहिंद सेना), प्रकाश सखाराम कळके (भारतीय किसान पार्टी), सुनील सखाराम तटकरे (अपक्ष), सुभाष पाटील (अपक्ष), संजय घाग (अपक्ष), अविनाश पाटील (अपक्ष), सुनील पांडुरंग तटकरे (अपक्ष), योगेश कदम (अपक्ष), मुजफ्फर जैनुद्दीन चौधरी (अपक्ष), मधुकर खामकर (अपक्ष)हे उमेदवार रिंगणात उभे आहेत.
सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्ते मतमोजणीच्या दिवसाची वाट पाहत असून, त्यांनी ढोल-ताशे, गुलालाची बुकिंग केली आहे. विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. गीते यांनी लोकसभा मतदारसंघात केलेली कामे; तसेच त्यांचा कार्यकर्त्यांसोबत असलेला जनसंपर्क त्यामुळे ते सहज निवडून येतील, असा विश्वास शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांना प्रशासनाचा दांडगा अभ्यास असून लोकापर्यंत निधी पोहचविण्याचे काम खऱ्या अर्थाने त्यांच्याकडूनच होऊ शकतो. त्यामुळे तटकरे 60 हजारांच्या फरकाने निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.