कोकण

सिंधुदुर्ग सर्वप्रथम कोरोनामुक्त करा : मुख्यमंत्री ठाकरे

सकाळ डिजिटल टीम

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात (sindhudurg district) आरोग्यसुविधा उपलब्ध झाल्या आहेत हा जिल्हा राज्यात सर्वप्रथम कोरोनामुक्त (covid-19) करा. येथील ऑक्सिजन प्लांटची (oxygen plant) क्षमता 20 मेट्रिक टनपर्यंत करा. महाराष्ट्र राज्यात अन्य ठिकाणीसुद्धा असे प्लांट उभे करण्यासाठी संबंधित यंत्रणेने पावले टाकावीत. आमचे यासाठी सदैव सहकार्य राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (cm uddhav thackeray) आज दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटनप्रसंगी केले.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, "तुम्ही सर्वजण कोविड संकटाचा मुकाबला धैयाने करतात हे कौतुकास्पद आहे. आत्मविश्वासाने छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे नेत आहात. सिंधुदुर्ग जिल्हा म्हटला की आपुलकी असणारी माणसे आहेत. कोविड संकट मोठे असताना नाईलास्तव काही निर्बंध घालावे लागत आहेत. संकटे येणारच त्याचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. राज्य सरकार प्रशासन (state government) या सर्व संकटावर मात करण्यासाठी सज्ज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्यातील पहिला ऑक्सिजन प्लांट 15 दिवसात सुरू झाला. हा जिल्हा राज्यात सर्वप्रथम कोरोनामुक्त होईल, असे काम करा. कोरोनामुक्तीसाठी वाडी, गांव, तालुका, जिल्हा, राज्य अशी मोहीम हाती घेणे काळाची गरज आहे. तिसरी लाट येईल तेव्हा येईल त्याअगोदर आपण सर्वच बाबतीत सतर्क राहिले पाहिजे." असे प्लांट राज्यात तसेच जिल्हा तालुका पातळीवर झाल्यास आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत होईल.

खासदार विनायक राऊत (vinayal raut) यांनी ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी प्रशासनाने गतिमान कार्य केले. कोविड संकटावर मात करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी कोरोना संकटात रत्नागिरी व कोल्हापूर (kolhapur) येथून ऑक्सिजन आणण्यासाठी जाण्यायेण्यासाठी 14 तास लागत होते. आता या प्लांटमुळे आरोग्य क्षेत्रात जलदगतीने सुविधा मिळणार आहेत. खाजगी व शासकीय हॉस्पिटलमध्ये हा ऑक्सिजन आता उपलब्ध होणार आहे. हा प्लांट खासदार राऊत, पालकमंत्री उदय सामंत, (uday samant) आमदार वैभव नाईक (vaibhav naik) यांच्या पुढाकाराने मार्गी लागला असल्याचे सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णालयांना ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा करणाऱ्या युनाइटेड एअर गॅस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून एमआयडीसी येथे नवीन लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. या ऑक्सिजन प्लांटचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आला. यावेळी लोकसभा गटनेते खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, आमदार दिपक केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अमित सामंत, संदेश पारकर, संजय पडते, नागेंद्र परब, आनंद बांदिवडेकर, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार अमोल पाठक, संजिता मोहपात्रा, पोलीस निरीक्षक शंकर कोरे, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अभियंता पी. अन्बलगन, जयभारत पालव, अमरसेन सावंत, मंदार शिरसाट, काका कुडाळकर, अभय शिरसाट, जीवन बांदेकर, सचिन काळप, युनाइटेड एअर गॅस प्रा. लि. कंपनीचे संचालक अतुल नलावडे, अमोल आयरे, कमलाकांत परब, मनोज वालावलकर, शिवाजी घोगळे, भास्कर परब, संतोष शिरसाट, अवधूत मालणकर, संजय भोगटे, राजू गवंडे, विकास कुडाळकर, अविनाश रेवंडकर आदी उपस्थित होते.

15 दिवसातील देशातील पहिला प्लांट

युनाइटेड एअर गॅस प्रा.लि. कंपनी हि कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी येथून ऑक्सिजन सिलेंडर रिफील करून जिल्ह्यातील रुग्णालयांना पुरवठा करत होती. मात्र जिल्ह्यात कोविडचे रुग्ण वाढत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये, यासाठी एमआयडीसी येथे लिक्विड ऑक्सिजन प्लांटची उभारणी युद्धपातळीवर अवघ्या 15 दिवसात केली आहे. कमीत कमी दिवसांत उभारण्यात आलेला राज्यातील हा पहिला ऑक्सिजन प्लांट असून 6 हजार लिटर एवढी ऑक्सिजन साठवण क्षमता आहे. यामध्ये 30 ड्यूरा सिलेंडर किंवा 600 जंबो सिलेंडर रिफील होणार आहेत. यामुळे आवश्यक प्रमाणात जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे, असे संचालक अमोल आयरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : थंडा थंडा कूल कूल, विद्यार्थ्यांसाठी शाळेने बनवला वर्गातच स्विमिंग पूल

SCROLL FOR NEXT