चिपळूण : आधुनिक महाराष्ट्राच्या विजेच्या स्वयंपूर्ततेसाठी कोयना विद्युत प्रकल्पाचे योगदान महत्त्वाचे आहे. आगामी काळात या प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोयना विद्युत प्रकल्प टप्पा चार विद्युतगृहाच्या पाहणी दरम्यान व्यक्त केला.
राज्यमंत्री शंभूराजे देसाई आमदार भास्कर जाधव यांनी कोयना प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी शासनाने भरीव निधी द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. कोयना प्रकल्पाच्या उत्पन्नातून स्थानिक विकास कामांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीत वाढ करावी अशी मागणी चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी केली. ओझर्डे येथे कोयना प्रकल्पाचा पाचवा टप्पा प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी किमान 500 कोटीची खर्च अपेक्षित आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्री आले कधी, गेले कधी समजलेच नाही -
प्रकल्पाचा टप्पा एक आणि टप्पा दोनचे वीज निर्मिती संच फार जुने आहेत, ते बदलण्याची गरज आहे. त्यासाठीही निधीची गरज आहे. सरकारने हा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी तत्कालीन ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्याकडे महानिर्मिती कंपनीकडून करण्यात आली होती. आज ठाकरे यांच्या दौऱ्यात ही मागणी पुन्हा चर्चेला आली. तेव्हा सरकार कोयना प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी शंभर टक्के निधी देईल अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली. पस्तीस मिनिटांच्या दौऱ्यात त्यांनी कोयना धरणाची पाहणी केली. त्यानंतर टप्पा 1 आणि 2 तसेच टप्पा ४ याची पाहणी केली.
कोयना प्रकल्पात वीजनिर्मिती कशी केली जाते हे त्यांनी समजून घेतले. सह्याद्रीच्या खोऱ्यात भूमिगत कोयना प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या अभियंत्यांचे त्यांनी कौतुक केले. यावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन व संसदीय कार्य अनिल परब, मुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव मिलिंद नार्वेकर, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री (गृह) शंभूराजे देसाई, सर्वश्री आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, शेखर निकम, वीज निर्मिती कंपनीचे कार्यकारी संचालक संजय खंडारे, कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय मोहिते, रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा, रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग उपस्थित होते.
हेही वाचा - अनधिकृत बांधकामाचा विषय म्हणजे ‘आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी ; मिऱ्या-नागपूर मार्ग -
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.