मालवण (सिंधुदुर्ग) - वर्षअखेर आणि नाताळ सुटीच्या निमित्ताने येथे दाखल झालेल्या हजारो पर्यटकांमुळे किनारपट्टी बहरून गेली आहे. किल्ला दर्शन, स्कूबा, स्नॉर्कलिंगसह, जलक्रीडा प्रकारांचा आनंद पर्यटकांकडून लुटला जात आहे. मासळीची आवक कमी असल्याने मासळीचे दर गगनाला भिडले असून मत्स्यखवय्यांना मासळीचा आस्वाद लुटण्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहे. वाहतूक कोंडीची समस्या भासू नये यासाठी स्थानिक पोलिसांसह जिल्हा वाहतूक विभागाचे पोलिस मुख्य नाक्यांवर तैनात करण्यात आले आहेत.
सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत चक्रीवादळ, अतिवृष्टीमुळे येथील पर्यटन व्यवसायास मोठा फटका बसला. त्यामुळे वर्षअखेरीस तरी येथे मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होतील, अशी अपेक्षा पर्यटन व्यावसायिकांना होती. त्यानुसार पर्यटकांच्या स्वागतासाठी व्यावसायिकांनी चोख नियोजन केल्याचे दिसून आले. सर्वसाधारणपणे 21 ते 29 डिसेंबरपर्यंत किनारपट्टी भागात रिसॉर्ट, निवास न्याहारी, लॉजिंग फुल झाले असल्याचे पहावयास मिळाले. किनारपट्टी भागातच वास्तव्यास पर्यटकांची जास्त पसंती असल्याचे दिसून आले. त्यादृष्टीने व्यावसायिकांनी चांगली सुविधा उपलब्ध करून दिली. 30, 31 डिसेंबर या कालावधीत मात्र किनारपट्टी भागातील अनेक रिसॉर्ट, निवास न्याहरीच्या ठिकाणी पर्यटकांचे बुकिंगच नसल्याचीही माहिती मिळाली आहे. या काळात येथील पर्यटन करून पर्यटक गोव्याच्या दिशेने रवाना झाले.
पर्यटकांच्या आगमनाने शहरातील चिवला बीच, धुरीवाडा, बंदर जेटी, दांडी किनारपट्टीसह, वायरी भुतनाथ, तारकर्ली, देवबाग किनारपट्टी गजबजून गेल्याचे चित्र आहे. साहसी जलक्रीडा प्रकारांकडे पर्यटकांचा ओघ जास्त असल्याने किनारपट्टी भागातील जलक्रीडा व्यवसाय तेजीत आहेत. यात स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंगसह, पॅरासेलिंग, अन्य वॉटरस्पोर्टस्चा आनंद पर्यटकांकडून लुटला जात आहे. यासह ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला, रॉकगार्डन, जयगणेश मंदिर या पर्यटनस्थळांनाही मोठ्या प्रमाणात पर्यटकांकडून भेटी दिल्या जात आहेत. पर्यटकांसह शैक्षणिक सहलीही सध्या येथे येत आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील उलाढालही वाढली आहे.
पर्यटन हंगाम बहरत असताना मासळीची आवक कमी असल्याने मासळीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. परिणामी मांसाहारी थाळ्यांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. आणखी दर वाढण्याची शक्यता हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केली. माशांच्या दरात वाढ झाली असली तरी मत्स्यखवय्यांकडून या मासळीला चांगली मागणी आहे. त्यामुळे या माशांचा आस्वाद लुटताना पर्यटकांना जादा पैसे मोजावे लागत आहेत.
मासळीचे दर असे
मत्स्याहारी थाळ्यांचे दर असे
चोख नियोजनामुळे कोंडी फुटली
पर्यटन हंगामात शहरात मोठ्या संख्येने पर्यटक आपली वाहने घेऊन दाखल होत असल्याने शहरातील मुख्य रस्त्यांवर सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या भेडसावते. त्यामुळे पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रमुख नाक्यावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. यात स्थानिक वाहतूक पोलिसांसह जिल्हा वाहतूक विभागाचे सात पोलिस कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहे. वाहतुकीच्या योग्य नियोजनामुळे या हंगामात वाहतूक कोंडीची मोठी समस्या भासली नसल्याचे दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.