Chief Minister Eknath Shinde Esakal
कोकण

Coca Cola: 'कोका कोला'ची महाराष्ट्रातील पहिली फॅक्टरी कोकणात उभी राहणार; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

कोकणातील कोणत्या जिल्ह्यात आणि कुठे ही कंपनी उभी राहणार जाणून घ्या

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध बेव्हरेज कंपनी 'कोका कोला' महाराष्ट्रातील पहिली फॅक्टरी कोकणात उभी राहणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या फॅक्टरीचं उद्घाटन गुरुवारी पार पडलं. यावेळी हा आनंदाचा क्षण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या प्रकल्पातील सर्व अडचणी दूर झाल्या असून चांगली सुरुवात कोकणच्या भूमीत होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, या प्रकल्पातील अडचणी दूर करण्याचं काम आपण केलं आहे. चांगली सुरुवात कोकणात सुरु होत आहे. एका बाजुला आरोग्याच्या अत्याधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. त्याचबरोबर आर्थिक प्रगतीच्या दृष्टीनं उद्योग भरभराट रोजगार हे देखील आवश्यक आहे. त्यामुळं उद्योगाची पावलं या भूमीत पडली पाहिजेत ही भूमिका राज्य शासनाची आहे.

थंडा मतलब आता फक्त कोका कोला नव्हे तर थंडा मतलब प्रोग्रेस असंही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. पर्यायवरणाचं रक्षण करतानाच औद्योगिकीरणही महत्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. कोकणातील आंबा-काजूच्या विकासाचं संवर्धन आपण करतोच आहोत परंतू अत्याधुनिक जगाची गरज ओळखून आपण औद्योगिकतेची कास देखील धरली पाहिजे.

हिंदुस्तान कोको कोला ब्रेव्हरेज कंपनीनं सुरुवातीला २५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहोत. विविध प्रकारची ६० उत्पादनं या कंपनीची देशभरात आहेत. या कंपनीनं हजारो कर्मचारी काम करतात. या कंपनीनं २०२३ मध्ये भारतात एकूण १२८४० कोटी रुपयांचा व्यवसाय केला. अशी एक मोठी कंपनी इथं उभी राहत आहे त्यामुळं लोकांना चांगला रोजगार उभा राहिलं. व्यवस्थापनानं स्थानिक लोकांना प्राधान्य कारखान्यात दिलं पाहिजे, असा आग्रह यावेळी मुख्यंमत्र्यांनी धरला.

फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१५ अमेरिका दौऱ्यातच याबाबत बोलणी झाली होती. पण नंतर सरकार बदलल्यानंतर ते काम थांबलं. कोकणानं नेहमीच बाळासाहेबांवर प्रेम केलं आहे. त्यामुळं कोकणी माणला वापरुन घ्यायचं काम आमचं सरकार कधी करणार नाही. इथल्या भूमिपुत्रांना मोठी स्वप्न दाखवायची आणि एखादा चांगला प्रकल्प आला की त्याला विरोध करायचं हे आम्हाला कधी शिकवलं नाही. त्यामुळेच आता हा प्रकल्प इथं सुरु होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

Accident News: देव तारी त्याला...! पाच मजली इमारत कोसळूनही तीन महिन्यांची चिमकुली सुखरुप बचावली, 27 जणांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपाचा धंदा - उद्धव ठाकरे

Mutual Fund: 3,000 रुपयांची SIP की 3 लाख रुपयांची Lumpsum: 30 वर्षांनंतर कोण देणार जास्त परतावा?

Nagpur Crime: नागपूर हादरलं! प्रियकराच्‍या मदतीने पतीचा खून; उत्तरीय चाचणीच्या अहवालातून खुलासा

SCROLL FOR NEXT