vishal kadav accident kokan marathi news
vishal kadav accident kokan marathi news 
कोकण

'या जवानाची' दिल्लीच्या एनएसजी टीममध्ये सहभागापूर्वीच जिवनातून एक्‍झिट ....

नागेश पाटील

चिपळूण (रत्नागिरी) :  भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेला जवान विशाल रघुनाथ कडव यांची कामगिरी दैदिप्यपान अशीच राहिली आहे. आर्मीत 2008 ला पहिल्याच प्रयत्नात भरती झालेल्या विशाल यांनी किकबॉक्‍सिंगमध्ये नैपुण्य मिळवले. कमांडोचे प्रशिक्षण घेत घातक टीममध्ये यशस्वी कामगिरी केली. नॅशनल सिक्‍युरिटी गार्ड (एनएसजी) मध्ये त्यांची निवड झाली होती. येत्या काही दिवसांत ते दिल्लीच्या एनएसजी टीममध्ये सहभागी होणार होते. त्यापूर्वीच मध्यप्रदेश येथील सागर शहरात अपघातात झालेली त्यांची एक्‍झिट, सर्वांच्या मनाला चटका लावणारी अशीच ठरली आहे. 

तालुक्‍यातील पिंपळी खुर्द येथील विशाल रघुनाथ कडव यांची 2008 मध्ये आर्मीत भरती झाली होती. सती चिंचघरी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचे 12 वी पर्यंतचे शिक्षण झाले. शालेय जीवनात त्यांनी धावणे प्रकारात नेहमीच पहिला क्रमांक पटकावला. 2008 ते 2011 या दरम्यान त्यांनी कानपूर येथे सेवा केली. त्यानंतर जम्मू काश्‍मिरमधील विविध भागासह गुजरातमध्ये त्यांनी सेवा केली. काही वर्षापूर्वी त्यांनी बेळगाव येथे कमांडो प्रशिक्षण घेतले होते. सैन्य दलातही त्यांनी बॉक्‍सिंगमध्ये नैपुण्य मिळवले होते.

किकबॉक्‍सिंगमध्ये उमटवला होता ठसा

कमांडोचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी घातक टीममध्येही काम केले होते. पुछ, जम्मू आदी विविध ठिकाणी कार्यरत असताना त्यांनी अतिरेक्‍यांवर कारवाई केली होती. त्यांचे वडीलही माजी सैनिक आहेत. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. एक मुलगा आणि पत्नीला त्यांनी मध्यप्रदेशला नेले होते. काही दिवसांपूर्वीच गावी येवून त्यांनी वडिलांची भेट घेतली होती. 

धाडसी कामगिरी आम्हाला भावली

विशाल कडव यांची टीममधील कामगिरी सुरेख अशीच ठरली आहे. किकबॉक्‍सिंगमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला होता. त्यांची धाडसी कामगिरी आम्हाला भावली होती. त्यांचे अपघाती निधन झाल्याचे दुःख आहे. 
-विकास खरात, 15 मराठा बटालियन टीममधील सहकारी. 

सर्वस्व पणाला लावले 
सीमेवर दहशतवादी व अतिरेक्‍यांचा खात्मा करण्यासाठी त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले होते. सध्या ते 15 मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते. धडाकेबाज कामगिरीमुळे त्यांची राखीव असलेल्या नॅशनल सिक्‍युरिटी गार्ड (एनएसजी) दिल्ली टीममध्ये निवड झाली होती. पुढील काही महिन्यात ते दिल्लीत दाखल होणार होते.  


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Latest Marathi News Live Update :उद्धव ठाकरे यांची आज अलिबागमध्ये सभा

SCROLL FOR NEXT