crime-logo.jpg
crime-logo.jpg 
कोकण

आंबेनळी दुर्घटनेतील मृत चालकावरच गुन्हा दाखल

सुनील पाटकर

महाड : संपूर्ण राज्यात हाहाकार माजवणारा आणि संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आंबेनळी घाटातील कोकण कृषी विद्यापीठाच्या अपघात प्रकरणावर अखेर पडदा पडणार आहे. या अपघात प्रकरणी पोलादपूर पोलिसांनी तब्बल 5 महिन्यांनी दुर्घटनाग्रस्त बसचा मृत चालक प्रशांत भांबिड यांच्यावर निष्काळजीपणाचा तसेच स्वत:सह बसमधील 30 प्रवाशांच्या मृत्युस कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची बस 28 जुलै 2018 ला एकतीस कर्मच्याऱ्यांना घेऊन राहूरी येथे निघाली होती. पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर असलेल्या आंबेनळी घाटात दाभिळ टोक जवळ ही बस खोल दरीत कोसळून 30 जणांचा मृत्यू ओढवला होता. तर या अपघातात याच बसमधून प्रवास करणारे प्रकाश सावंत-देसाई हे मात्र आश्चर्यकारकरित्या बचावले होते. या अपघातानंतर वाचलेले देसाईच गाडी चालवत असल्याचा आरोप त्यांच्यावर मृतांच्या काही नातेवाईकांनी केला होता. तर त्यांच्या बदलीसाठी दापोलीत मोर्चाही काढण्यात आला होता. त्यानुसार विद्यापीठाने त्यांची मुख्यालयातून रत्नागिरी येथे बदली केली होती.

सोशल मिडीया, वृत्तपत्रे व वाहिन्यांवर अनेक वेगवेगळे दावे आरोप केले जात होते. त्यामुळे या अपघात संशयाच्या फेऱ्यात राहिला होता. परंतु बचावलेले एकमात्र सावंत-देसाई यांची जबानी महत्वाची असल्याने त्या माहिताच्या आधारे पोलिसांनी तपास केला. त्याआधारे बसमध्ये विद्यापीठाचे दोन चालक होते. त्यांच्यापैकी प्रशांत भांबिड हे अपघात झाला त्यावेळी गाडी चालवत होते. प्रारंभी या अपघाताची रस्ता अपघात अशी नोंद पोलादपूर पोलिस ठाण्यात झालेली होती. परिवहन विभागाने दरीतील बसही बाहेर काढून पाहणी केली होती. पोलिसांनी 5 महिने या प्रकरणाचा तपास करुन चालक प्रशांत भांबिड यांच्यावर रस्ता हा सरळ व अत्यंत कमी चढणीचा असताना वाहन निष्काळजीपणाने व रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष चालवत अपघातास कारणीभूत तसेच स्वत:च्या व इतर 29 प्रवाशांच्या मरणास कारणीभूत असल्याचा ठपका ठेवला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: पुनरागमन करताच मॅक्सवेलचा गुजरातला मोठा दणका! कर्णधार शुभमन गिलला धाडलं माघारी

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : माढा येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटीलांचा भाजपा उमेदवाराला पाठिंबा

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT