contractor stop work because central government stopped the bills 
कोकण

मोदी सरकारने बील थांबविले ; ठेकेदारांनी चक्क कामच बंद पाडले 

मुझफ्फर खान

चिपळूण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदीकरण करणार्‍या कंपन्यांचे पैसे केंद्र सरकारने थकविले आहेत. त्याचा परिणाम चौपदरीकरणावर झाला आहे. चिपळून टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम कंपनीच्या पोट ठेकेदारीनी बंद पाडले आहे. ठेकेदारांची सुमारे दहा कोटीची बिले कंपनीने दिलेली नसल्याने ही कामे बंद पाडण्यात आली आहेत. 

शनिवारी (दि.14) पोट ठेकेदारांनी कंपनीच्या व्यवस्थापकाबरोबर चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. महामार्गावरील परशुराम ते खेरशेत या 36 किलोमीटरचे काम चेतक एंटरप्राईजेस या कंपनीने घेतले आहे. गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेल्या या कामातील काही भाग हा स्थानिक सात पोट ठेकेदारांकडून केला जात आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या ठेकेदारांची सुमारे दहा कोटींची बिले कंपनीने दिलेली नसल्याने संतप्त पोट ठेकेदारानी या टप्प्यातील ज्या ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत ती सर्व बंद केली. त्याचबरोबर कंपनीकडून काही ठिकाणी सुरू असलेली कामे बंद पाडली. कंपनीच्या कामथे येथील गेटवर डंपर उभा करून गेटही बंद केले आहेत. 

याबाबत माहिती देताना पोटठेकेदार महादेव कदम म्हणाले, कंपनीने आमच्याशी करार करताना पंधरा दिवसानंतर केलेल्या कामाचे पैसे दिले जातील असे ठरले होते. नऊ महिने झाले तरी अद्याप केलेल्या कामाचे पैसे मिळालेले नाही. सरकारकडून आम्हाला पैसे मिळत नाहीत. असे कंपनीकडून सांगितले जात आहे. पोट ठेकेदारांनी पदरचे पैसे टाकून कामे केली आहेत. काहींनी बँकेचे कर्ज काढले आहे. त्याचे हप्ते भरण्यासाठीसुद्धा पैसे नाहीत. कंपनीने सरकारकडून पैसे घेवून आमची देणी द्यावी किंवा स्वतःच्या शेअर्समधून आमची देणी द्यावी. अशी मागणी कंपनीकडे करण्यात आली आहे. जोपर्यंत पैसे मिळणार नाही तोपर्यंत काम करणार नाही आणि चौपदरीकरणाचे कामही चालू करू देणार नाही. अशी भूमिका घेतली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

Asia Cup 2025 Super 4 Schedule: भारतीय संघ कोणत्या तारखांना कोणाला भिडणार? जाणून घ्या सुपर ४ चं संपूर्ण वेळापत्रक

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

SCROLL FOR NEXT