Corona Care Center to be started in Guhagar taluka 
कोकण

गुहागर तालुक्यात होणार कोरोना केअर सेंटर

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढणारी संख्या पाहता गुहागर तालुक्‍यात 100 बेडचे कोरोना केअर सेंटर उभारण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी चार जागांची पाहणी केली आहे. त्यासाठी 50 लाखांचा निधी देणार आहे, अशी माहिती आमदार भास्कर जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. 

ते म्हणाले, "सरकारने प्रत्येक आमदाराला कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी 50 लाख रुपये खर्च करण्याची अनुमती दिली आहे. अद्याप आपण तो निधी वापरला नव्हता. आता योग्य वेळ आली आहे. गुहागर तालुक्‍यात कोविड केअर सेंटर उभारण्याची तयारी केली आहे. 100 बेडच्या हॉस्पिटलसाठी शासनाने अनुमती दिलेले 50 लाख रुपये देत आहे. योग्य ठिकाणी योग्य निधी खर्च करणे गरजेचे असते. या हॉस्पिटलसाठी आजच प्रांताधिकारी जागा निश्‍चित करतील आणि कामाला सुरवात होईल.'' 

जिल्ह्यात ज्याप्रमाणे कोरोनाचे वातावरण भासवले जात आहे, तेवढी परिस्थिती नाही. प्रशासनाने वस्तुस्थिती लोकांसमोर मांडली पाहिजे, असे सांगून जाधव म्हणाले, ""जिल्ह्यात 96 कोरोना बाधित असून लवकरच शंभरी पार होईल, असे सातत्याने दाखवले जात आहे; पण अनेक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काहीजण येत्या काही दिवसांत घरी जातील. काहींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता रुग्णालयात उपचार घेणारे किती, ही सर्व आकडेवारी सविस्तरपणे लोकांसमोर प्रशासनाने मांडली पाहिजे.'' 

ते म्हणाले, ""रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल हे कोविड हॉस्पिटल झाले आहे. त्यामुळे इतर रुग्णांची व्यवस्था डेरवण येथील रुग्णालयात करण्याची विनंती केली आहे. त्याप्रमाणे काम सुरू झाले आहे. कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करण्याची तयारी डेरवण रुग्णालयाने दाखवल्यास तत्काळ त्यासाठी शासनाच्या माध्यमातून मी प्रयत्न करेन.'' 

राजकीय तोटा सहन करेन; पण 
मुंबईकर चाकरमान्यांना सोडून जाणाऱ्या गाड्या प्रशासनाने अडकून ठेवल्या आहेत. हे योग्य नाही. प्रशासनाची ही भूमिका समजलेली नाही. मुंबई वाचवायची असेल, तर मुंबईवरचा ताण कमी करावाच लागेल. मुंबई रिकामी करावीच लागेल. सरकारने त्यासाठी एसटीची व्यवस्था करावी. माझ्या भूमिकेवर मी ठाम असून त्याचा राजकीय तोटा देखील होण्याची श्‍यक्‍यता आहे; पण आता लोकांना वाचवणे हेच महत्त्वाचे आहे, असेही जाधव म्हणाले. 

प्रशासनाबरोबर आढावा बैठका घेणार 
अद्याप प्रशासनाला कोणतीही तसदी दिलेली नाही. बैठकाही घेतल्या नाहीत; पण आताची परिस्थिती बघता आता प्रशासनाबरोबर सलग आढावा बैठका घेणार आहे, असे आमदार भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले. 
हे पण वाचा - शिराळा तालुक्‍यातील आणखी एका  पोलिसाचा मुंबईत कोरोना ने मृत्यू -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : कर्जाच्या पैशातून मोदींचा केक कापणार? वाढदिवस साजरा करणे म्हणजे आर्थिक गुन्हा, संजय राऊतांचे राज्य सरकारवर ताशेरे

Latest Marathi News Updates : कांद्याचे दर घसरले, शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

जरा आवरा अन् Google Gemini ला स्वत:चे पर्सनल फोटो देण्यापूर्वी ही बातमी वाचा... नाहीतर वेळ निघून जाईल, तज्ज्ञांचा इशारा

कलाकार हवा तर असा ! दशावतारचं यश पाहून हिंदी मीडियाने केलं दिलीप प्रभावळकरांचं कौतुक "बॉलीवूडला लाज वाटायला.."

Rahuri Accident: 'दुचाकींच्या अपघातात एक ठार, एक जखमी'; दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर भीषण धडक

SCROLL FOR NEXT