कोकण

दिलासादायक; चिपळुणात हॉटस्पॉट परिसरातील रुग्णवाढ नियंत्रणात

तालुक्‍यात 4 गावे; उपायांसाठी ग्राम कृतिदलाची मदत

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : तालुक्‍यात कोरोनाचा संसर्ग वाढतोच आहे. ज्या गावात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक आहे, अशी गावे कोरोना हॉटस्पॉट जाहीर करून तिथे प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू केले आहेत. तालुक्‍यातील सद्यःस्थितीला पिंपळी खुर्द, चिंचघरी, वालोपे आणि पोफळी ही चार गावे प्रातांधिकाऱ्यांनी कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून जाहीर केली आहेत; मात्र या गावात कोरोना रुग्णवाढीचा वेग नियंत्रणात राहिला आहे.

वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने 5 हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ठिकाणी कडक निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये तालुक्‍यात शहरासह खेर्डी व सावर्डेचा समावेश आहे. त्या व्यतिरिक्त अन्य गावांमध्ये लॉकडाउनबाबतची मुभा देण्यात आली. परिणामी संबंधित गावांमध्ये दैनंदिन व्यवहार नियमित सुरू राहिल्याने त्याचे परिणाम हळूहळू दिसू लागले आहेत. तालुक्‍यात प्रथम मांकडी बुद्रुक गाव हॉटस्पॉट ठरला होता. येथील परिस्थिती आता पूर्वपदावर आली असून 18 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यानतंर आता पोफळी, पिंपळी खुर्द, चिंचघरी व वालोपे ही चार गावे हॉटस्पॉट जाहीर केली आहेत. या चारही गावांमध्ये आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यासाठी ग्रामपंचायती व ग्राम कृतिदलाची मदत घेतली जात आहे.

"पोफळी येथे हॉटस्पॉट जाहीर झाल्यानंतर महाजेनकोचे अधिकारी तसेच यंत्रणेची बैठक झाली. गावात औषध फवारणी सुरू केली आहे तर महाजेनको कंपनीने केंद्रात 25 बेडचे विलगीकरण कक्ष सुरू केला आहे. कामगारांना तिथेच राहण्याची व्यवस्था केली आहे. बाधित रुग्ण वाढू नयेत, यासाठी खबरदारी घेतली जात आहे."

- बाबू साळवी, पंचायत समिती सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KCC Loan: शेतकऱ्यांना ५ लाखांपर्यंतचे किसान क्रेडिट कार्ड कर्ज कधीपासून मिळणार? मोठी अपडेट आली समोर

कधी मालिका, कधी नाटक; सहा राज्य चित्रपट पुरस्कार जिंकणारी 'ही' अभिनेत्री 'माया' मध्ये साकारणार मुख्य भूमिका

BMC Election: राहुल नार्वेकरांचा निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव? आठ उमेदवारांची न्यायालयात धाव; तातडीच्या सुनावणीस नकार

Siddheshwar Yatra 2026: यंदा सिद्धरामेश्वरांचा अक्षता सोहळा 13 की 14 जानेवारी? जाणून घ्या मुख्य पूजा विधी

Latest Marathi News Live Update : प्रचाराच्या अखेरच्या दिवशी 13 तारखेला मुख्यमंत्र्यांचा नागपुरात एक खास रोड शो

SCROLL FOR NEXT