corona infected patient from Borivali found in the forest  
कोकण

'तो' कोरोना पाॅझिटीव्ह जंगलात पळून गेला, मग सर्वांनी 'त्याला' घेरले अन्....

सकाळवृत्तसेवा

दाभोळ (रत्नागिरी) - उपजिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची गाडी पाहून धूम ठोकलेल्या दापोली तालुक्यातील बोरिवली येथील कोरोना बाधित रुग्ण अखेर आज दुपारी 2 वाजणेच्या सुमारास म्हणजे 16 तासांच्या शोधानंतर जंगलात सापडल्याने त्याला शोधणाऱ्या शासकीय यंत्रणानी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

दापोली तालुक्यातील 4 जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आल्यावर तालुक्यातील बोरिवली येथील शाळेत क्वारंटाइन केलेला व कोरोना बाधित असल्याचा अहवाल आलेल्या त्या व्यक्तीला दापोली येथे आणण्यासाठी आरोग्य विभागाची गाडी काल रात्री बोरिवली येथे गेली होती, या गाडीला पाहून मी लघुशंकेला जाऊन येतो असे सांगून त्या कोरोना बाधित व्यक्तीने तेथून पलायन केले होते. त्यामुळे त्या व्यक्तीला आणायला गेलेल्या आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ यांची पाचावर धारण बसली होती.

या पळालेल्या कोरोना बाधित व्यक्तीचा रात्रभर परिसरातील जंगलात सर्वांनी शोध घेतला मात्र तो सापडला नाही. आज सकाळी पुन्हा आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामस्थ, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार, त्यांचे सहकारी व पोलीस मित्र यांनी या व्यक्तीचा पुन्हा शोध सुरू केला, पळून गेलेली ही व्यक्ती रात्रभर पळून थकली होती, जंगलातील एका पाणवठ्यावर पाणी पिऊन ती पुन्हा जंगलात पळत असे, शोध घेणाऱ्या पथकाच्या ते लक्षात आल्यावर त्यांनी या पाणवठ्यावर लक्ष ठेवले आज दुपारी ही पळालेली व्यक्ती पाणी पिण्यास तेथे आल्यावर सर्वांनी त्याला घेरल्यावर तो शरण आला. त्यानंतर त्याला दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान हा कोरोना बाधित रुग्ण सापडल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Tourism Expo : पर्यटनाचे अनेक पर्याय एकाच छताखाली; ‘सकाळ टुरिझम एक्स्पो’ला पुण्यात आजपासून प्रारंभ

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यात पावसाचा ‘यलो अलर्ट’, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय बोरस्ते यांची निवड

School Bus : ‘विद्यार्थी वाहतूक नियमावली’ कागदावरच! परिवहनमंत्र्यांनी सूचना देऊन वर्ष उलटले, तरी अहवाल गुलदस्तात

ZP Election : निवडणुकीसाठी ३० टक्के अतिरिक्त मनुष्यबळ; २३ हजार जणांची नियुक्ती

SCROLL FOR NEXT