Corona report of dead person in Burundi are Negative 
कोकण

बुरोंडीत येऊन त्या मृत्यु पावलेला इसमाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह...

सकाळवृत्तसेवा

दापोली - मुंबई येथून बुरोंडी तेलेश्वर नगर येथे आलेल्या व होम क्वाॅरंटाईन केलेल्या एका 55 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला होता. या व्यक्तीचा स्वॅब चा नमुना मिरज येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता, त्याचा अहवाल आज सायंकाळी निगेटिव्ह आल्याने सर्वाना दिलासा मिळाला आहे.

घाटकोपर (मुंबई) येथून बुरोंडी तेलेश्वरनगर येथे  20 मार्च रोजी आलेल्या एका 55 वर्षीय व्यक्तीला परवा रात्री (९ मार्च) रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास अस्वस्थ वाटूलागले होते, त्याला शेजाऱ्यांनी प्रथम एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. तेथे तपासून त्याला उपजिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले होते, उपजिल्हा रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्याला तपासून ते मृत घोषित केले होते.

या व्यक्तीला मुंबई येथून आल्याने  24 मार्च रोजी तपासून होम क्वारंटाईंन चा सल्ला देण्यात आला होता, या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने प्रशासनाची धावपळ उडाली होती,  या व्यक्तीचा स्वॅब चा नमुना घेऊन तो तपासणीसाठी मिरज येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता.

 गेले दोन दिवस या व्यक्तीचा मृतदेह दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला होता, तो आता अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या   ताब्यात देण्यात येणार असून शासकीय निर्देशानुसार त्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या व्यक्तीला घेऊन उपजिल्हा रुग्णलयात घेऊन आलेल्या 10 जणांना संस्थात्मक  क्वारंटाइन करण्यात आले होते, त्यांनाही हा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने घरी सोडायचे का याचा निर्णय प्रशासन घेणार आहे.

यापूर्वीही खेड येथील कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला होता व त्याला भेटण्यासाठी  दापोली येथून गेलेल्या त्याच्या नातेवाईकांचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. हे तीनही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने दापोलीकरांनी व प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandigram Bypoll : नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठी घडामोड; काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यानंतर पक्षातील बड्या नेत्यालाही अटक

Pune University Mess Fee Hike: पुणे विद्यापीठातील मेस दरवाढीचा भार विद्यार्थ्यांवर नको; विद्यापीठाने अनुदान द्यावे: ‘विद्यार्थी संघर्ष कृती समिती’ची मागणी

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : बुलढाण्यात कंटेनर-दुचाकीचा भीषण अपघात; मायलेकाचा जागीच मृत्यू

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

SCROLL FOR NEXT