कोकण

'उदय सामंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा'

सकाळ डिजिटल टीम

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाच्या (ratnagiri district) दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. जिल्ह्यात सतराशेपेक्षा अधिक रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू (covid-19 patients) झाला आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हे अपयश प्रशासनाचं नसून रत्नागिरीचे आमदार, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (uday samant) यांचं असून त्यांनी केलेल्या कामाचे फळ सर्वांना भोगावे लागत आहे. आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून नैतिक जबाबदारी स्वीकारून उदय सामंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी आमदार बाळ माने (bal mane) यांनी केली आहे.

रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, देशात, राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे; मात्र रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग (sindhudurg) हे दोन्ही जिल्हे संकटात आहेत. महाविकास आघाडीचे (maha vikas aaghadi) हे अपयश आहे. एप्रिलमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वपक्षीय बैठक झाली, त्या वेळीही मी सांगितलं होतं की, आपली आरोग्य व्यवस्था शासकीय असो वा खासगी, ही अपुरी आहे. बेड, ऑक्सिजन उपलब्ध नाही. पॅरामेडिकल स्टाफ, डॉक्टर्स उपलब्ध नाहीत. प्रतिबंधात्मक उपाययोजना करून हे कोरोनाचं संक्रमण कसं थांबविता येईल, यासाठी धोरण ठरवले नाही.

केंद्र सरकारच्या (central government) मार्गदर्शक तत्त्वानुसार वागलो असतो तर कदाचित रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आला असता; मात्र आजही परिस्थिती अतिशय गंभीर आहे. लॉकडाउन (lockdown) हा त्यावरचा उपाय नाही. चुकीच्या नियोजनामुळे व्यापारी, मध्यमवर्गीय, नोकरदार त्रस्त आहेत. हे प्रशासनाचे अपयश नसून मंत्री उदय सामंत यांचे आहे. कारण ते धोरण ठरवतात आणि त्याची अंमलबजावणी प्रशासन करते. आज ते सिंधुदुर्गचे पालकमंत्री असून रत्नागिरीच्या पालकमंत्र्यांच्या थाटात ते वागतात.

रत्नागिरीकरांनी सामंत यांना चारवेळा निवडून दिले. तुम्ही जबाबदारपणे येथे ठाण मांडून बसायला हवे होते. ते मुंबईत असतात, तिथे व्हर्च्युअल बैठका घ्या. त्यांच्या वागण्याबोलण्यात उदासीनता दिसते. अपयशाचे खापर प्रशासनावर फोडून उपयोग नाही, प्रशासन हे हुकमाचे ताबेदार असतात. जर प्रशासनाकडे व्यवस्थाच नसेल तर प्रशासन काय करणार, असं माने या वेळी म्हणाले.

राजकारण करायचे नाही पण

राजकारण करायचे नाही. पण समाज व्यवस्था, व्यापारी, सामान्य नागरिक पूर्णपणे विषण्ण मनःस्थितीत आहेत. योग्य निर्णय वेळीच घेण्यात आले नाहीत. सारखे बदलण्यात आलेले निर्णय, टेस्टिंग- ट्रेसिंग योग्य प्रकारे झाले नाही. ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला. रोगापेक्षा लॉकडाउनचा इलाज भयंकर झालेला आहे, असा टोला माने यांनी हाणला.

दडपशाही विरोधात आवाज उठवणार

लॉकडाउनच्या गोंधळामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शहरातील रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था आहे. नळपाणी योजना अपूर्ण आहे. खड्डे पडलेल्या रस्त्यांवरून जाताना वाहनांचे अपघात होत असून रिक्षा, दुचाकीचे नुकसान होत आहे. पादचाऱ्यांना चालता येत नाही. यामुळे सत्ताधाऱ्यांविरोधात सोशल मीडियावरून अनेक प्रकारची टीका-टिप्पणी होते. पण थेट बोलण्यास लोकं आणि नेतेमंडळी घाबरत आहेत. दडपशाही व दबावामुळे लोक भयभीत आहेत. या दडपशाहीविरोधात आवाज उठवणार असल्याचे बाळ माने यांनी सांगितले.

बाळ माने उवाच..

  • देशात, राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय

  • रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे संकटात

  • महाविकास आघाडीचे हे अपयश; परिस्थिती अतिगंभीर

  • जिल्ह्यात सतराशेपेक्षा अधिक रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

  • केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन नाही

  • सिंधुदुर्गचे पालकमंत्री रत्नागिरीच्या पालकमंत्र्यांच्या थाटात

  • मुंबईत असतात; वागण्याबोलण्यात दिसते उदासीनता

  • रोगापेक्षा लॉकडाउनचा इलाज भयंकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

Swati Maliwal: '...तर सिसोदिया आज इथं असते...', आपच्या मोर्चाच्या निर्णयानंतर स्वाती मालीवाल यांचं ट्विट

Simple Hacks: कुलर सुरू असताना पण खोली दमट वाटते? थंडावा निर्माण करण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT