Corona tested after coming in contact with Vaibhav Naik All administer report negative 
कोकण

सुस्कारा : आ वैभव नाईक यांच्या संपर्कात आलेल्या अधिकाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह..कोणाचे वाचा-

शिवप्रसाद देसाई

ओरोस (सिंधुदुर्ग) : आ वैभव नाईक यांच्या संपर्कात आल्याने कोरोना चाचणी केलेल्या सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय चाकुरकर या सर्वांचे नमूने निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा हायसी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात नव्याने ५ रुग्ण मिळाले असून जिल्ह्याची रुग्ण संख्या २९५ झाली आहे.


 सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी याच्यासह प्रशासनामधील सर्व अधिकारी यांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते यांचाही निगेटीव्ह रिपोर्ट आला आहे.


  शिवसेना आमदार वैभव नाईक यांना २० जुलै रोजी कोरोनाची बाधा झाली होती.  आमदारांनी प्रशासकीय बैठकांना उपस्थिती लावली होती. त्यामुळे सर्व प्रशासकिय यंत्रणा हादरली होती. त्यामुळे सर्व अधिकारी सेल्फ क्वांरनटाईन होत त्यांनी कोरोना तपासणीसाठी नमुने दिले होते. या सर्वाचा कोरोना तपासणी अहवाल प्राप्त झाला असून जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलीपे याचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला असून सर्व अधिकारी सेवेत रुजू होत प्राशकीय कामकाज सुरळीत सुरू झाले आहे.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diwali Online Shopping: दिवाळीत बंपर डिस्काउंटच्या नावाखाली होतेय फसवणूक! 'हे' सायबर फ्रॉड माहीत असलेच पाहिजेत...

तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवातील वक्तव्यावरून वाद; व्हायरल व्हिडीओबाबत अखेर गुरुदेव सेवा मंडळाने दिलं स्पष्टीकरण

Dhanteras 2026: धनत्रयोदशीला सोने खरेदीचा विचार करताय? गेल्या वर्षी घेतलेल्या सोन्याची किंमत वर्षभरात किती वाढली?

Anthropic IPO: ChatGPT ला टक्कर देणाऱ्या AI कंपनीचा मोठा धमाका! IPO मधून 100 अब्ज डॉलर उभारण्याची तयारी; काय आहे प्लॅन?

Ambabai Temple Kirnotsav: अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव अन् दिवाळी एकाच कालावधीत; गरुड मंडपाचीही होईल चाचणी

SCROLL FOR NEXT