coronavirus impact konkan sindhudurg 
कोकण

सिंधुदुर्गात कोरोनाचे नवे 5 रुग्ण 

विनोद दळवी

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आज नवीन 5 कोरोना रुग्ण मिळाले आहेत तर 5 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या 208 रुग्ण उपचाराखाली असून यातील 3 रुग्णांची तब्बेत चिंताजनक आहे. 

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णाची संख्या 6 हजार 154 झाली आहे. यातील 5 हजार 776 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 164 जणांचे निधन झाले आहे. परिणामी उपचाराखाली 208 रुग्ण राहिले आहेत. यातील 7 रुग्ण जिल्ह्याबाहेर जाऊन उपचार घेत आहेत. उर्वरित 201 रुग्णावर जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटल अथवा होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली. 

208 रुग्ण सक्रिय असून त्यापैकी तीन रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील दोन रुग्ण ऑक्‍सिजनवर तर एक रुग्ण व्हेन्टीलेटरवर उपचार घेत आहेत. जिल्ह्याबाहेर जाऊन सात रुग्ण उपचार घेत आहेत. आरटीपीसीआर टेस्टमध्ये 31 हजार 186 नमुने तपासण्यात आले. यातील 4 हजार 289 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नव्याने 564 नमुने घेण्यात आले. ऍन्टिजन टेस्टमध्ये एकूण 23 हजार 309 नमुने तपासले. पैकी 1 हजार 986 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नवीन 53 नमूने घेण्यात आले. आतापर्यंत एकूण 54 हजार 495 नमुने तपासण्यात आले. 

तालुका निहाय पॉझिटिव्ह रुग्ण (कंसात मृत्यूचा आकडा) ः देवगड-434 (9), दोडामार्ग-355 (4), कणकवली-1869 (41), कुडाळ-1390 (32), मालवण-531 (17), सावंतवाडी-826 (43), वैभववाडी-182 (7), वेंगुर्ले-547 (10), जिल्ह्याबाहेरील रुग्ण-20 (1). तालुकानिहाय सक्रिय रुग्ण ः देवगड-21, दोडामार्ग-11, कणकवली-53, कुडाळ-53, मालवण-16, सावंतवाडी-18, वैभववाडी-4, वेंगुर्ले-24 व जिल्ह्याबाहेरील 3 अशाप्रकारे आहेत. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Pune: 'आर्टी'च्यावतीने शनिवारी पुण्यात अभियंता उद्योजक कार्यशाळा

Latest Marathi News Updates: कन्नडच्या एसडीएम कार्यालयासमोर कोळी समाजाचे आमरण उपोषण

Pachod News : गुन्हा दाखल केलेल्या इसमांवर पोलिसांनी कारवाई न केल्याने एकाने व्हिडीओ बनवून केले विष प्राशन; घाटी रुग्णालयात उपचार सुरू

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

SCROLL FOR NEXT