coronavirus sakal
कोकण

सिंधुदुर्गात कोरोनाचा कहर; नवे 197 रूग्ण

सिंधुदुर्गात कोरोनाने आज कहर केला. तब्बल १९७ रुग्ण मिळाले आहेत. यामुळे सक्रिय रुग्णसंख्या एक हजाराच्या पुढे गेली आहे.

सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्गात कोरोनाने आज कहर केला. तब्बल १९७ रुग्ण मिळाले आहेत. यामुळे सक्रिय रुग्णसंख्या एक हजाराच्या पुढे गेली आहे.

ओरोस - सिंधुदुर्गात (Sindhudurg) कोरोनाने (Corona) आज कहर केला. तब्बल १९७ रुग्ण (Patients) मिळाले आहेत. यामुळे सक्रिय रुग्णसंख्या एक हजाराच्या पुढे गेली आहे. सर्वाधिक ४१ रुग्ण कणकवली तालुक्यात मिळाले असून १५ रुग्ण कोरोनामुक्त (Coronafree) झाले आहेत. ८९९ नमुने आज तपासण्यात आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५४ हजार ३२३ कोरोना रुग्ण मिळाले आहेत. यातील ५१ हजार ८५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १४६६ रुग्णाचे निधन झाले आहे. १००१ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील ३९ रुग्ण शासन निर्मित कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल या शासकीय संस्थेत उपचार घेत आहेत. उर्वरित ९६२ रुग्ण होम आयसोलेटेड आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यानी दिली.

जिल्ह्यात आज मिळालेले रुग्ण (कंसात एकूण रुग्ण) देवगड १३ (६६६२), दोडामार्ग २५ (२९१८), कणकवली ४१ (१०२५१), कुडाळ ३६ (१११८४), मालवण २२ (७९५०), सावंतवाडी ३१ (७८३८), वैभववाडी ६ (२४३३), वेंगुर्ले १८ (४८१४), जिल्ह्याबाहेरील ५ (२७३). तालुका निहाय सक्रीय रुग्ण (कंसात मृत्यूचा आकडा) देवगड ७६ (१८०), दोडामार्ग ११७ (४५), कणकवली १८७ (३००), कुडाळ २१२ (२४३), मालवण १३४ (२८९), सावंतवाडी १४८ (२०७), वैभववाडी ३५ (८२), वेंगुर्ला ७७ (१११) जिल्ह्याबाहेरील रुग्ण १५ (९).

१००१ रुग्ण सक्रिय असून त्यापैकी १२ रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे. यातील १० रुग्ण ऑक्सिजनवर तर दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहे. आर.टी.पी.सी.आर टेस्ट मध्ये ३ लाख २४ हजार ४८२ नमुने तपासण्यात आले. यातील ३८ हजार ९४६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नव्याने ७१७ नमूने घेण्यात आले. ॲन्टिजन टेस्टमध्ये एकूण २ लाख ८५ हजार ७९३ नमुने तपासले. पैकी १५ हजार ७७९ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नवीन १८२ नमूने घेण्यात आले. आतापर्यंत एकूण ६ लाख १० हजार २७५ नमूने तपासण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Decision: शहरात उपचार सोपे, गावात सुविधा वाढणार... मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोककेंद्रित महत्त्वाचे निर्णय!

Pune Traffic: चांदणी चौकात महामार्ग ओलांडताना जीवघेणी कसरत; प्रवाशांची गैरसोय : पादचारी मार्गाचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : भुजबळ साहेब लवकर बरे व्हा, खासदार सुप्रिया सुळे यांची पोस्ट

IPL 2026 Update: काव्या मारनचा धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत, असं करण्याची खरच गरज आहे का? सनरायझर्स हैदराबाद...

जगात कुठं असं होतं का? प्रकल्प रखडल्यानं फडणवीस कंत्राटदारांवर संतापले, म्हणाले, १५ दिवसात पूर्ण करा

SCROLL FOR NEXT