The cost of training in Vaibhavwadi is in doubt 
कोकण

वैभववाडीत प्रशिक्षण खर्च संशयाच्या भोवऱ्यात 

एकनाथ पवार

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजनेतर्गंत प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी कार्यक्रमावर झालेला लाखो रूपये खर्च संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. जेवणापासून ते पेन खरेदीपर्यंत घोळ झाल्याचे माहिती अधिकारात स्पष्ट झाले आहे. या अवास्तव खर्चाबाबत पंचायत समितीचे पदाधिकारी अनभिज्ञ आहेत. या सर्व प्रकारात पीपीई खरेदीत स्वत:चा हंडा भरून घेतलेल्या "त्या' अधिकाऱ्याचा हात असल्याची चर्चा आहे. 
राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजनेतर्गंत तालुक्‍यातील पंचायत समिती पदाधिकारी, सरपंच आणि ग्रामसेवकांना प्रशिक्षण कार्यक्रमाचे 15 व 16 नोव्हेंबर या कालावधीत आयोजन केले होते. ग्रामपंचायत आराखड्यासंदर्भात हे दोन दिवशीय प्रशिक्षण होते. 

या प्रशिक्षण कार्यक्रमावर पंचायत समिती स्तरावरून 1 लाख 31 हजार 615 रूपये खर्च झाला आहे. यामध्ये जेवण व नाष्ट्यावर तब्बल 41 हजार 520 रूपये, प्रोजेक्‍टर, बॅनर आणि इतर 16 हजार रूपये, साऊंड सिस्टीमवर 9 हजार रूपये, चहा व पाणी 9 हजार 675 रूपये, स्टेशनरी साहित्य 39 हजार 220 रूपये आणि मार्गदर्शक तज्ञांना मानधन म्हणून 14 हजार रूपये, असे एकुण 1 लाख 31 हजार 615 रूपये खर्च दाखविला आहे. या दोन दिवशीय प्रशिक्षणाला 130 प्रशिक्षणार्थी उपस्थित असल्याचे दाखविले आहे.

प्रशिक्षणासाठी एका शेतकरी गटाला दोन दिवसांचे जेवण, नाष्टा आणि चहाचे काम 20 हजार रूपयाला देण्यात आले होते. प्रत्यक्षात त्याच्या नावे 41 हजार 520 रूपयांचा धनादेश देवून त्यांच्याकडून इतर खर्च देखील याच रक्कमेतून करावयाचा असल्याचे सांगुन त्यांच्याकडून 21 हजार रूपये एका अधिकाऱ्याने परत घेतले. एक दिवस शाकाहरी आणि एक दिवस चिकन जेवण त्या गटाने दिले. प्रत्यक्षात बिल मात्र स्पेशल सुरमई जेवणाचे काढले आहे. एक थाळीचा दर 250 रूपये दाखविण्यात आला आहे. चहा त्याच गटाने पुरविला असताना स्वतंत्र चहावर 4 हजार 875 रूपये खर्च दाखविण्यात आला आहे. याशिवाय पाण्यावर देखील अवास्तव खर्च दाखविण्यात आला आहे. 

पंचायत समितीच्या मालकीची साऊंड सिस्टीम आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाला हीच साऊंड सिस्टीम वापरण्यात आली; परंतु साऊंड सिस्टीमचे भाडे म्हणून 9 हजार रूपये खर्च झाला आहे. स्टेशनरीवर केलेला खर्चही अवाजवी आहे. प्रशिक्षणार्थीना एक दोन रूपयाचे पेन आणि चार पाच रूपयाचे पॅड दिले होते; परंतु दिलेला पेन 30 रूपये किंमतीचा आणि पॅड 30 रूपये किंमतीचे आहे.

शासन निर्णयाची झेरॉक्‍स काढून तयार केलेल्या पुस्तकाची किंमत 180 रूपये आहे. स्टेशनरीवर तब्बल 39 हजार 220 रूपये खर्च झाला आहे. या प्रशिक्षणात दिलेल्या स्टेशनरी साहित्य, चहा, जेवण, नाष्टा यासंदर्भात अनेक सरपंच आणि पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी प्रशिक्षणाला सुरमई जेवण कधीच दिले नसल्याचे सांगितले. पंचायत समितीचे पदाधिकारी देखील या खर्चाबद्दल अनभिज्ञ आहेत. 

वैभववाडी पंचायत समितीचा कार्यभार आताच स्वीकारला आहे. सध्या एका कामासाठी दुसरीकडे आहे; परंतु आल्यानंतर या खर्चासंदर्भात माहिती घेईन आणि योग्य तो निर्णय घेईन. 
- विद्या गमरे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती वैभववाडी 

प्रशिक्षणावर नेमका किती आणि कसा खर्च झाला, याची माहिती घेवून त्याची खातरजमा केली जाईल. जर चुकीच्या पद्धतीने खर्च झाला असेल तर त्यासंदर्भात नक्कीच ती बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्दशनास आणून देण्यात येईल. 
- अक्षता डाफळे, सभापती, पंचायत समिती वैभववाडी 

सरपंच आणि ग्रामसेवक प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी कार्यक्रमावर झालेला खर्चात घोळ असेल तर त्याबाबतीत शहानिशा करून मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी करण्यात येईल. कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. 
- लक्ष्मण रावराणे, माजी सभापती, पंचायत समिती सदस्य

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: रेल्वेच्या चौथ्या लाईन साठी शेतीच्या अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

'या' नक्षत्रांमध्ये जन्मलेली मुलं असतात अतिशय भाग्यशाली; सौंदर्य, यश आणि धनसंपत्तीने होतात समृद्ध

SCROLL FOR NEXT