cousins attack koyta her brother and her wife in sindudurg kokan marathi news 
कोकण

त्याने केला भावासह वहिनीवर कोयत्याने वार अन्....

सकाळ वृत्तसेवा

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : काजू बागेत काजू गोळा करण्यासाठी गेलेला चुलत भाऊ आणि वहिनीवर चुलत भावाने पाळकोयत्याने वार केला. त्यात दोघे गंभीर जखमी झाले. दोघांच्या जीवावरचे संकट हात आणि बोटावर निभावले. जखमी दाम्पत्याचे नाव संदेश दत्ताराम गवस व रोशन संदेश गवस असे आहे. या प्रकरणी दीपक यशवंत गवस (रा. वरची धाटवाडी कसई दोडामार्ग) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक सुनील थोपटे यांनी त्याबाबत माहिती दिली. ही घटना सोमवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली. 

गंभीर जखमी  : दोडामार्गातील घटना 
गवस दाम्पत्य काजू बागेत काजू काढण्यासाठी गेले होते. तेथे जाऊन दीपकने ते काजू आपले आहेत. तुम्ही काढायचे नाहीत, असे सांगून वहिनीला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. संदेश यांनी समजावून परत पाठवले; पण थोड्या वेळाने तो कोयता घेऊन परत आला आणि वहिनी रोशन यांच्या हातावर वार केला. त्याला अडवण्याचा प्रयत्न संदेशने केला. त्यावेळी त्याच्या हातावरही त्याने वार केला. दोघेही गंभीर जखमी झाले. त्याप्रकरणी त्यांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 
दोघांपैकी पत्नीच्या मनगटाला, तर पतीच्या बोटाला गंभीर इजा झाली. दोघांवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Accident: राहुल गांधींच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात! पाच वाहने आणि रुग्णवाहिकेची धडक

''नशीब समजा रामने अल्पसंख्यांकाना नाही मारलं'', मतदार यादीतल्या चुकांवर युपी निवडणूक आयोगाचं अजब उत्तर

Gold Rate Today: दिवाळीआधी सोन्याचे भाव धडाम! ऑक्टोबरमध्ये 7,000 तर उच्चांकापासून 38,000 रुपयांनी स्वस्त; मुंबई-पुण्यात भाव किती?

Maharashtra Live News : देऊळगाव राजा मधील दोन बड्या मसाला व्यावसायिकांवर एफडीएची धडक कारवाई, एक कोटींचा माल जप्त

Kolhapur Rickshaw Drivers RTO Report : 'सायेब, कुठं जाणार? चला की सोडतो...'; कोल्हापूरच्या रिक्षाचालकांचे मराठी खणखणीत; परीक्षेची गरजच नसल्याचा पाठविला अहवाल

SCROLL FOR NEXT