कोकण

चिपळुणात कोरोनाची भीती नाहीच; शासन आदेशाला नागरिकांचा खो

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : चिपळूण शहरात संचारबदीच्या (lockdown) काळात लोकांचा मुक्त संचार सुरू आहे. एकीकडे कोरोना (Corona Patient) रुग्णांची संख्या वाढत चालली असताना बेजबाबदार नागरिक संचारबंदी झुगारून मुक्त संचार करू लागल्याने सरकारच्या आदेशाला (Order) खो बसत आहे. बाजारात खरेदीसाठी आणि मॉर्निंग वॉकला (Mornign Walk) नागरिक बाहेर पडल्याचे चित्र आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात (Maharashtra) संचारबंदीची घोषणा केली असली तरी चिपळुणात या संचारबंदीचे गांभीर्यच नागरिकांना नसल्याचे मंगळवारी उघड झाले. सरकारकडून (Government) सकाळी ७ ते ११ या वेळेत केवळ अत्यावश्‍यक सेवेतील नागरिकांना घराबाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे; मात्र अत्यावश्‍यक सेवेत नसलेली शहरातील अनेक दुकाने सकाळी ७ ते ११च्या दरम्यान उघडी असतात. त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी (Mob) होत आहे. संचारबंदीनंतर चिपळूण शहरातील मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती मात्र रस्त्यावरही गाड्या धावतच होत्या.

अत्यावश्‍यक सेवेत भाजी मार्केट (Market) आणि इतर किराणा सामनाची दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली असल्याने या ठिकाणी नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांना जाब विचारण्यासाठी पालिका यंत्रणा आणि पोलिसांनीही जास्त स्वारस्य दाखवले नसल्याने संचारबंदीतही नागरिकांनी आपला मुक्त संचार सुरूच ठेवला.

बहादूरशेख नाका, चिंचनाका आणि शहरातील इतर नाक्‍यांवर पोलिसांचा (Police) चोख बंदोबस्त होता. या ठिकाणी येणाऱ्या वाहनचालकांची कसून चौकशी करूनच सोडले जात होते. परंतु शहरातील गर्दी दुर्लक्ष (Ignore) केली जात होती. जुने बसस्थानक परिसरात मंगळवारी वाहनांची वर्दळ नेहमीपेक्षा जास्त होती. दुचाकी, रिक्षा, मालवाहू वाहने व खासगी वाहतुकीच्या गाड्या रस्त्यावर फिरत होत्या.

दुकाने बंद तरीही रस्त्यावर वर्दळ

शहरात दुपारी अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व दुकाने (shop) बंद होती; मात्र नागरिकांची वर्दळ रत्यावर मोठ्या प्रमाणावर सुरू होती. यामुळे या लॉकडाउनचा कोणताही परिणाम शहरात झाल्याचे दिसून आले नाही. शहरात कोरोना रुग्णांच्या (Covid-19) संख्येत झपाट्याने वाढ होत असताना ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन अतोनात प्रयत्न करत आहेत; मात्र नागरिकांकडून काही प्रमाणात प्रशासनाच्या निर्बंधांचे उल्लंघन केले जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने कंटेन्मेट झोन सील करण्यात आले असून विविध रस्तेदेखील बंद करण्यात आले आहेत.

"तालुक्‍यातील कोरोना हॉटस्पॉट (Hostspot) असलेल्या गावात माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. यातून कोरोना बाधित आणि संशयित रुग्ण शोधले जात आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाला (Health Department) सूचना करण्यात आल्या आहेत. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि सकाळी ११ नंतर होणारी गर्दी टाळण्यासाठी पोलिसांना कडक कारवाईच्या सूचना केल्या आहेत."

- जयराज सूर्यवंशी, तहसीलदार, चिपळूण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT